उद्धव ठाकरेंनी पहिला शब्द पाळला, ‘त्या’ शेतकऱ्याला सांगलीवरुन बोलावलं
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray calls farmer for oath ceremony ) निवड करण्यात आली.
सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या गुरुवारी 28 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray calls farmer for oath ceremony ) निवड करण्यात आली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी शिवाजी पार्कात होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. Uddhav Thackeray calls farmer for oath ceremony
उद्धव ठाकरे यांच्या या शपथविधीपासून देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. पंतप्रधानांपासून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, विविध देशाच्या राजदूतांना, तसेच शेतकऱ्यांपासून वारकऱ्यांपर्यंत, व्हीआयपीपासून व्हीव्हीआयपीपर्यंत निमंत्रण देण्यात आलं आहे.
शब्द पाळला, शेतकऱ्याला निमंत्रण
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक खास शेतकरी सांगलीवरुन येणार आहे. संजय सावंत असं या शेतकऱ्याचं नाव आहे. उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर होते त्यावेळी या शेतकऱ्याने त्यांची भेट घेतली होती. “शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा” अशी विनंती संजय सावंत यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभं करतो, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी संजय सावंत दिलं होतं.
शिवसेनेने संजय सावंत यांना निमंत्रित केलं असून, ते सांगलीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
संजय सावंत आणि त्यांची पत्नी रुपाली सावंत हे दाम्पत्य, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला गेले होते. उद्धव ठाकरे 15 नोव्हेंबरला सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते.
शिवतीर्थावर जय्यत तयारी
मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी (Uddhav Thackeray Oath Ceremony Preparation) शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
संबंधित बातम्या
ठाकरेंचा ग्रँड शपथविधी, शिवतीर्थावर सहा हजार चौ.फू. स्टेज, 60 हजार खुर्च्या, 20 एलईडी