Uddhav Thackeray : ‘वाढदिवसाला फुलांचे गुच्छ नको, सदस्य नोंदणी अर्जांचे, पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या’, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

वाढदिवसानिमित्त मला भेट द्यायचीच असेल तर सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे (Affidavit) गठ्ठे द्या, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलाय.

Uddhav Thackeray : 'वाढदिवसाला फुलांचे गुच्छ नको, सदस्य नोंदणी अर्जांचे, पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या', उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:28 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना दुभंगली. 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात सामिल झाले. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी शिवसेना कुणाची? शिवसेना भवन कुणाचं? आणि धनुष्यबाण कुणाचा? असा सवाल विचारला जातोय. त्यातच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मला भेट द्यायचीच असेल तर सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे (affidavit) गठ्ठे द्या, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलाय. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या शिवसेना शाखा क्रमांक 205 या शाखेचं लोकार्पण केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवेत. याचं कारण आता त्यांनी प्रोफेशनल एजन्सी कामाला लावल्या आहेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. तुम्ही कितीही पैसा ओतला तरी हे माझं शिवसैनिकांचं वैभव त्यांना पुरुन उरेल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला दिलाय. फक्त शिवसेना फोडण्याची त्यांची चाल नाही तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा भगवा फोडण्याची त्यांची चाल आहे. आजपर्यंत अनेकजण आपल्याला विचार होते की तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय. तर त्यांना सांगायचं की शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते आणि भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो, अशी घणाघाती टीकाही ठाकरे यांनी भाजपवर केलीय.

‘हिंमत असेल तर बाळासाहेबांचा फोटो लावू नका’

आता आदित्य फिरतोय, मी ही पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. त्यांना एक तर शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. ते बंडखोर नाहीत, हरामखोर आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी, असा टोलाही ठाकरे यांनी बंडखोरांना लगावलाय.

‘संकटांना मातीत गाडून शिवसेना पुन्हा उभी राहिली’

या सामान्यांना असामान्य केलं होतं. ते आता निघून गेले. आता पुन्हा एकदा आपल्याला सामान्यातून असामान्य लोक घडवायचे आहे. 56 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. पिढ्यामागून पिढ्या गेल्या. पण त्यावेळी आपल्या मनगटात ताकद आहे हे बाळासाहेबांनी सांगितलं नसतं तर ही मनगटं पिचून गेली असती. या मनगटात ताकद ज्या शिवसेनेनं दिली ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. याचं कारण स्पष्ट आहे, त्यांच्या मागची जी ताकद आहे, महाशक्ती, कळसूत्री बाहुल्यांचे संचालक त्यांना शिवसेना संपवायचीय. त्यांना मुंबईवरुन आपला भगवा हटवायचा आहे आणि त्यांचा ठसा उमटवायचा आहे. पण ज्या ज्या वेळी संकटं आली त्या संकटांना मातीत गाडून शिवसेना पुन्हा उभी राहिली, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केलाय.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.