Uddhav Thackeray: कारभार ऑनलाईन, एक्झिटही ऑनलाईनच, वाजपेयींनी ज्या संधीचं सोनं केलं तशीच संधी उद्धव ठाकरेंनी गमावली?

राज्यपालांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणेच बहुमत चाचणी तातडीने घेण्याबाबतचे निर्देश दिले. पण ही बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला उद्धव ठाकरे सामोरे गेले नाही.

Uddhav Thackeray: कारभार ऑनलाईन, एक्झिटही ऑनलाईनच, वाजपेयींनी ज्या संधीचं सोनं केलं तशीच संधी उद्धव ठाकरेंनी गमावली?
वाजपेयींनी ज्या संधीचं सोनं केलं तशीच संधी उद्धव ठाकरेंनी गमावली?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 1:34 PM

मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी बुधवारी राजीनामा दिला. त्यानंतर आता नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. हे सगळं घडलं, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे. या बंडानंतरही उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच हार मारली. त्यांनी राजीनामा दिला. बहुमत चाचणीत आकड्यांचा खेळच मला खेळायचा नाही, असं त्यांनी म्हटलंय. बहुमत चाचणी पुढे ढकलली जावी, यासाठी शिवसेना थेट सर्वोच्च न्यायालयातही गेली. पण तिथेही त्यांची हार झाली. सुप्रीम कोर्टात बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावली. राज्यपालांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणेच बहुमत चाचणी तातडीने घेण्याबाबतचे निर्देश दिले. पण ही बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला उद्धव ठाकरे सामोरे गेले नाही. त्यांनी नैतिकता जपली. बहुमताचा आकडा ठाकरेंकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रीपद (Chief Minister Resign) त्यागलं. पण यात एक महत्त्वाची संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली.

कारभार ऑनलाईन

उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे, जगात कोरोना महामारीचं संकट ओढावलं. या संकाटत उद्धव ठाकरे सरकारचा कारभार ऑनलाईन सुरु होता. अनेक गोष्टी ऑनलाईनच केल्या गेल्या. मग त्या कॅबिनेट बैठका असतील, राज्यातील जनतेशी करण्यात आलेलं संबोधन असेल, किंवा मग इतर शासकीय बैठका असतील.. ऑनलाईन पद्धतीने बहुतांश कामकाज चाललं होतं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची ओळख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली होती, त्याच पद्धतीनं लाईव्ह येत मुख्यमंत्री या पदावरुन उद्धव ठाकरे पायउतारही झाले.

बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा दिली असतील तर…

बहुमत चाचणीचा खेळ मला खेळायचा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं खरं. पण त्यात त्यांनी एक संधी गमावली असल्याचाही एक तर्क लढवला जातोय. अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्या संधीचं सोनं केलं होतं, तीच संधी खरंतर उद्धव ठाकरे यांनाही चालून आली होती. ही संधी उद्धव ठाकरे यांनी गमावली. बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरं गेले नाहीत. सभागृहात जाऊन उद्धव ठाकरेंनी जर बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा दिली असतील तर त्यांना बंडखोर आमदारांना थेट डोळ्यात डोळे खालून भिडता आलं असतं. त्यांना थेट सवाल उपस्थित करता आला असता.

हे सुद्धा वाचा

सभागृहातल्या भाषणाची ऐतिहासिक नोंद होते

सभागृहात आज विश्वासमत सादर झालं असतं, तर त्यावेळेस उद्धव ठाकरेंना विरोधकांवर, बंडखोरांवर तुटून पडता आलं असतं. त्यांनी जी नैतिक प्रतिमा जपलीय ती आणखी उजळली असती. लोक त्यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल भावनिक तर आहेत. पण त्या भावना आणखी घट्ट करण्याची संधी उद्धव ठाकरेंना चालून आली होती. ऑनलाईन भाषणाची कुठेही नोंद होत नाही. पण सभागृहातल्या भाषणाची ऐतिहासिक नोंद होते. हे भाषण रेकॉर्डवर राहतं. त्याचं जतन होतं, आणि दाखले दिले जातात. ती संधी गेली.

अटलजींचं सभागृहातलं ऐतिहासीक भाषण

उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून शेवटचं भाषण!

उद्धव ठाकरेंना विरोधकांवर, बंडखोरांवर तुटून पडता आलं असतं

सभागृहात आज विश्वासमत सादर झालं असतं. त्यावेळेस उद्धव ठाकरेंना विरोधकांवर, बंडखोरांवर तुटून पडता आलं असतं. त्यांनी जी नैतिक प्रतिमा जपलीय ती आणखी उजळली असती, लोक त्यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल भावनिक आहेत. त्या भावना आणखी घट्ट करता आल्या असत्या.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.