Uddhav Thackeray Interview : “हम दो एक कमरे में बंद हो असं सध्याचं सरकार, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर…”, ठाकरेंच्या वादळी मुलाखतीचा दुसरा टिझर रिलीज
Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे यांच्या वादळी मुलाखतीचा दुसरा टिझर रिलीज
मुंबई : राज्यात मोठे राजकीय बदल झाले. झालेल्या सगळ्या सत्ता संघर्षासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Interview) यांना काय वाटतं? त्यांची मतं काय आहेत? त्यांना या सगळ्या बंडाविषयी आणि येणाऱ्या भविष्यातील निवडणुकांविषयी काय वाटतं? या संदर्भात सामनाचे संपादक खासदार संजय राऊत (Sanajy Raut) यांनी मुलाखत घेतली त्याचा दुसरा टिझर आता रिलीज झाला आहे. “हम दो एक कमरे में बंद हो असं सध्याचं सरकार आहे”, उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणत आहेत. शिवाय सर्वाधिक चर्चेत असणारे दोन प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. उद्धव ठाकरे राजीनामा द्यायला तयार होते का? आणि दुसरा विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं? जे प्रश्न महाराष्ट्र्तील जमतेला पडले त्याची उत्तर उद्या आणि परवा बघायला मिळतील. कारण उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखती 26 आणि 27 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा टिझर आज संजय राऊतांनी ट्विट केला आहे.
संजय राऊतांचं ट्विट
भाग:२ खणखणीत मुलाखत! सामना. “उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?” २६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGse
हे सुद्धा वाचा— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022
पहिला टीझर
ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टिझर काल प्रदर्शित झाला. साधारण 45 सेकंदाचा हा टीझर आहे. त्यात संजय राऊत राज्यातील राजकीय स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी थेट सवाल करताना दिसत आहेत. राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरेंही त्याच जोमात आणि ठाकरे शैलीत उत्तर देताना पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, निवडणूक आयोगापुढे एक नवीन खटला उभा राहतोय, धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंना पुरावे द्यावे लागत आहेत शिवसेना खरी किंवा खोटी, आज जी फूट दिसतेय शिवसेनेत, याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती, नक्की काय चुकलं असावं आपलं, की महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकला? अशा प्रश्नांचा समावेश आहे. दरम्यान, 26 आणि 27 जुलैला उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे.
सामना 26 आणि 27 जुलै उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत pic.twitter.com/UrzhfDvdx7
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
ठाकरेंची वादळी मुलाखत
शिवसेनेत उभी फूट पडली अन् त्यामुळे राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर ठाकरें यांची होणारी ही पहिली मुलाखत आहे. त्यामुळे या मुलाखती दरम्यान ते कोण-कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात ते पाहणं महत्वाचं असेल.