Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले 5 मोठे मुद्दे, बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र
मुलाखतीमधील पाच महत्त्वाचे मुद्दे
मुंबई – आपल्या नेतृत्वासमोरील गंभीर आव्हानाला तोंड देत उद्धव ठाकरे (Udhdav Thackeray) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनाला (Saamana) दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र केलं आहे. आज आणि उद्या मुलाखतं प्रसारीत होणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. आज त्यातला एक भाग प्रसिद्ध झाला आहे. त्यातील पाच महत्त्वाचे मुद्दे…एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून फारकत घेऊन आपली भूमिका वेगळी असल्याचे दाखवून दिले. ते जाताना अनेक आमदार घेऊन गेले. त्यानंतर पक्ष आमचा असून आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्यावर आधारीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे .
- कोरोनाच्या काळात ज्यावेळी माझं ऑपरेशन झालं त्यावेळी मला डॉक्टरांनी विचारलं की कुठे जायचं आहे तुम्हाला. माझी परिस्थिती इतकी नाजूक होती की मी थेट मातोश्रीला जाण्याचा निर्णय घेतला. मला डॉक्टरांनी जर गुंगीच्या औषधांमध्ये जरी विचारलं असतं की तुम्हाला कुठे जायचं आहे. तरी मी त्यांना मातोश्रीला जायचं आहे असं सांगितलं असतं.
- ज्यावेळी आपलं ठरलं होतं. अडीच-अडीच वर्षे त्यावेळी समजा मुख्यमंत्री पद अडिच वर्षे दिलं असतं. तर इतकी नाटकं करायला लागली नसती. आता ते म्हणतात की शिवसेना आमची नाही. कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
- माझी खूप मोठी चूक झाली आहे. ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले आहे, तेच आज शिवसेना विकायला निघाले आहेत. सद्या काय सुरु आहे. दोन लोकांचे मंत्रिमंडळ आहे ? ‘आम्ही दोघे, एका खोलीत बंद आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. कधी होईल माहीत नाही आणि या दोघांच्या मंत्रिमंडळातही बोलत असताना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा माईक मधेच ओढतात असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. आपल्या सरकारमध्ये सभ्यता आणि समन्वय होता. अजित पवारांनी माझा माईक कधीच हिसकावून घेतला नाही. त्यांनी शिवसेनेबाहेर काहीही केले तरी त्यांचा हेतू सफल होणार नाही. त्यांच्या गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल असंही उद्धव ठाकरे प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
- शिंदे यांची महत्त्वाकांक्षा राक्षसी आहे. यापूर्वी त्यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची दिसत होती. आता ते शिवसेना पक्षप्रमुखपद पाहत आहेत. पण तुम्ही माझ्या वडिलांचा वापर का करत आहात? त्यांचे नाव वापरणे बंद करा आणि आपले अस्तित्व आणि आपल्या गटाचे अस्तित्व आपल्या पालकांच्या नावाने तयार करा.
- महाविकास आघाडीसोबत युती करून जर आम्ही चुकी केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. पण आता निवडणुका व्हायला हव्यात असं मला वाटतंय. शिवसैनिक आमच्या बाजूने आहेत. शेवटी जनत मला ओळखते. आमची सहावी पिढी जनतेसाठी काम करीत आहे.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update