Video: आमदारांना घरं देणार! Uddhav Thackeray यांची घोषणा, पण घोषणेनंतर खळखळून का हसले ठाकरे?
Uddhav Thackeray Laughing Video : राज्यातील आमदारांनाही कायमस्वरुपी हक्काचं घर मिळेल, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे. ही घोषणा करताना उद्धव ठाकरे सभागृहात खळखळून (Uddhav Thackeray laugh) हसले.
मुंबई : राज्यातील आमदारांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील आमदारांनाही कायमस्वरुपी हक्काचं घर मिळेल, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे. ही घोषणा करताना उद्धव ठाकरे सभागृहात खळखळून (Uddhav Thackeray laugh) हसले. आमदारांच्या घरांसाठी करण्यात आलेल्या घोषणेदरम्यान, मुख्मयंत्र्यांनी हास्यविनोद केला. जवळपास तीनशे आमदारांना घरं देणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी कायमस्वरुपी घरं देणार की काही काळासाठी, यावरुन मुख्यमंत्र्यांनी थट्टामस्करी करत सभागृहात आमदारांची फिरकी घेतली. राज्यात विषय मांडल्यानंतर आमदारांना कुठेतरी चांगलं घर मिळावं आमदार असेपर्यंत, असं बोलून उद्धव ठाकरे थांबले. यानंतर मुख्यमंत्री खळखळून हसलेत. समोर बसलेले आमदार (MLA in Assembly) नेमकी कशी प्रतिक्रिया देतात, हे उद्धव ठाकरे पाहण्यासाठी बोलताना थांबले आणि हसू लागले.
नेमकं काय म्हणाले ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी सभागृहात म्हटलंय की,
मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय, की मुंबईतल्या जनतेसाठी आमदारांनी सभागृहात मुद्दे मांडलेत. त्यांचे प्रश्न मांडले. पण लोकप्रतिनिधींचं काय? तर याही बाबतील जवळपास तीनशे आमदारांसाठी घरं बांधली जाणार आहेत. त्यांनाही घरं दिली जाणार आहेत. सर्वपक्षीय आमदारांना या योजनेचा लाभ होणार आहेत. सर्वपक्षीय आमदारांचे एकमेकांशी चांगले संबंध असतात. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी चांगलं घर मिळावं आमदार असे पर्यंत, (खळखळून हसले)..
यानंतर उद्धव ठाकरे यांनी समोर बसलेल्या आमदारांच्या प्रतिक्रिया काय येतात, हे निरखून पाहिलं. त्यानंतर सरकारमधील आमदार मंत्र्यांना आणि समोर बसलेल्या आमदारांना उद्देशून पुन्हा वक्तव्य केलं, आणि म्हटलं, की..
आमदार असेपर्यंत की नंतरपण.. (पुन्हा खळखळून हसले) मी प्रतिक्रिया बघितली, असेपर्यंत म्हटल्यानंतर कसे रिएक्ट होत आहेत..
पाहा नेमकं काय झालं सभागृहात?
शिवसेना आमदारानंच केली होती मागणी
आमच्यासारखा कुणीतरी नवीन आमदार निवडून आल्यानंतर आमदारांचा वन बीएचके का असेना, सरकारमार्फर घर मिळावं, अशी मागणी आमदार उदयसिंह राजपूत यांनी सभागृहात केली होती. उदयसिंह राजपूत हे शिवसेनेच आमदार असून ते औरगाबादच्या कन्नड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी बुधवारी सभागृहात याबाबत मागणी केली होती. त्यांनी केलेल्या मागणीनंतर दुसऱ्याच दिवशी आमदारांच्या घराबाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.