आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली (Uddhav Thackeray meet Sonia Gandhi). ही भेट जवळपास 1 तास सुरु होती. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील हजर होते. या 1 तासाच्या भेटीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काय नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्याप माध्यमांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे याविषयी कमालीची उत्सुकता तयार झाली आहे.
Congress President Smt. Sonia Gandhi & Shri @kharge meet with Maharashtra CM @OfficeofUT, Shri @AUThackeray, Shri @rautsanjay61 & Shri @NarvekarMilind_ pic.twitter.com/uxIu1SDAY0
— Congress (@INCIndia) February 21, 2020
महाराष्ट्रात महाविकासआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः सध्याचा ज्वलंत विषय असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) यावर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचंही समोर आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काँग्रेस आणि शिवसेनेतील मतभेदाच्या विषयांवरही चर्चा झाली का? आणि काय चर्चा झाली याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते @kharge जी, मंत्री @AUThackeray, खासदार @rautsanjay61 जी, शिवसेना सचिव @NarvekarMilind_ जी उपस्थित होते. pic.twitter.com/LDlCd3Qzfg
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 21, 2020
उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला विरोध केला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एनपीआरला विरोध नसल्याचं म्हटलं आहे. मोदींची भेच घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या भेटीत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा केली. हा कायदा कुणाला देशातून काढण्यासाठी झालेला नाही. शेजारच्या राष्ट्रातील हिंदू बांधवांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. जनगणना होणं आवश्यक आहे. एनआरसी केवळ आसामपर्यंत मर्यादित राहिल. एनपीआर कुणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी नाही. लोकसंख्या मोजण्यासाठी दर 10 वर्षांनी एनपीआरची अंमलबजावणी होते. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह आढळलं तर तेव्हा नक्कीच आक्षेप घेऊ.”
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आदित्य ठाकरेंचीही विशेष उपस्थिती
राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
Uddhav Thackeray meet Sonia Gandhi