“शिवरायांचा अपमान करणारी व्यक्ती पंतप्रधानांसोबत एकाच व्यासपीठावर, याचा अर्थ काय?”

ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर तोफ डागली...

शिवरायांचा अपमान करणारी व्यक्ती पंतप्रधानांसोबत एकाच व्यासपीठावर, याचा अर्थ काय?
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 3:23 PM

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर (Eknath Shinde) शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. पण मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. आज आंबेडकरी चळवळीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेगटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर तोफ डागलीय. राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाचाही समाचार घेतलाय.

कोश्यारींवर टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केलीय. महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी व्यक्ती पंतप्रधना नरेंद्र मोदींसोबत एका व्यासपीठावर पाहायला मिळते. याचा अर्थ काय? महाराष्ट्रानं याचा काय अर्थ घ्यायचा?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

“एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे. त्यावर कुणी बोलत नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री माज आल्यासारखी वक्तव्य करत आहेत. त्यावर आमचे मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. त्याची भूमिका काय? हे त्यांनी स्पष्ट करायला हवं”, असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केलीय.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या 701 कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्गाचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे लोकार्पण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर कोश्यारी पंतप्रधानांसह एका व्यासपीठावर दिसले. त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केलीय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.