‘बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय’, एवढंच नाही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली, एकनाथ शिंदे यांच्यावर काय टीका केली हे या बातमीत विस्तृत वाचा

'बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय', एवढंच नाही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 9:43 PM

मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगावातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाषण केलं. या भाषणात उद्धव ठाकरे यांचा टीकेचा रोख हा एकनाथ शिंदे आणि भाजपावर दिसून आला. यातही उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर पहिल्यांदाच कडक शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कोणत्या मुद्द्यावंर टीका केली आहे, ते खाली विस्तृत दिलेले आहेत, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. टीकेची चौफेर बॅटिंग करताना अमित शहा यांना मुंबई आणि महाराष्ट्राविषयी आव्हान देखील दिलं आहे. उद्धव ठाकरे यांचं गोरेगावातील हे भाषण वेगळं आणि सर्वांचा समाचार घेणारं होतं अशी चर्चा आहे.

बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रभर फिरतेय, ठाणे- पालघरमध्ये मुली विकल्या जात आहेत आणि आपले मुख्यमंत्री फिरतायत. गल्लीत गोंधळ आहे, आणि हे दिल्लीत मुजरा करत फिरतायत आजही हे दिल्लीत फिरतायत.

शिंदे गटाचा यावेळी मिंधे गट असा उच्चार

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाचा यावेळी मिंधे गट असा उच्चार केला.एवढंच नाही ढोकळा खायला गेले सुरतला गेले आणि आमचा वडापावचा ठेचा त्यांना गरम लागला, असा समाचार त्यांनी शिंदे गटाचा घेतला.

आई विकायला निघालेली औलाद दुर्देवाने महाराष्ट्राची

आई विकायला निघालेली औलाद दुर्देवाने महाराष्ट्राची निघाली. ठाकरे कुटूंब संपवण्यासाठी आपला मुन्नाभाई त्यांनी सोबत घेतला आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राऊत यांचं कौतुक केलं, मोडेन पण वाकणार नाही

यावेळी त्यांनी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचं कौतुक केलं, मोडेन पण वाकणार नाही, अशी भूमिका आपल्या संजय राऊत यांची आहे, म्हणून आजही या भाषणात त्यांच्यासाठी एक खुर्ची आपण सोडलीय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.