Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक, आदित्य आणि रश्मी ठाकरेंसह शिवसैनिक शिवतीर्थवर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरेंनी त्यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांना अभिवादन केलंय.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक, आदित्य आणि रश्मी ठाकरेंसह शिवसैनिक शिवतीर्थवर
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 12:39 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवतीर्थवर जात बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray Death Anniversary) अभिवादन केलंय. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित आहेत. यासह शेकडो शिवसैनिकांनी शिवाजीपार्कचा परिसर गजबजलेला पाहायला मिळतोय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्मृतीस्थळावर जात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं.यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबतच संजय राऊत चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे इतर नेतेही उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा बाजार मांडू नये, अशी विनंती त्यांनी केलीय. काही लोकांना बाळासाहेबांचा विचार समजायला दहा वर्षे लागली.विचार मांडाताना त्याला कृतीची जोड लागते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला टोला लगावला आहे.

सगळं आपल्या बुडाखाली घ्यायचं हा भाजपचा मनसुबा. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबतही तेच घडतंय, असंही ठाकरे म्हणालेत.

सावरकरांचं देशासाठीचं योगदान अमुल्य आहे. त्यांचा हिंदुत्वाचा विचार काल, आज आणि उद्याही आम्हाला आदरणीय आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदरच आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.