Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची अखेर राजीनाम्याची घोषणा, बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद, प्रेम राहू देण्याचं आवाहन
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाहीय. माझी इच्छा होती नव्हती तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंब माहीत आहे. आम्ही हिंदूंसाठी काम करतो. मी सगळ्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. तुम्ही प्रेम दिलं आशीर्वाद दिला, मी घाबरणारा नाही. उद्या कारण नसताना शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचं धनी व्हायचं नाही’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘आज आयुष्य सार्थकी लागलं अशी भावना’
उद्धव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंतची वाटचाल तुमच्या सहकार्याने चांगली झाली. सरकार म्हणून काय केलं? सुरुवातच आपण रायगडला निधी देऊन सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आता पीक विमा योजनेचे बीड पॅर्टनही करू घेतले. या सर्व धबडग्यात तुम्ही विसरणार नाही पण काही गोष्टा बाजूला पडतात म्हणून सांगतो. आज आयुष्य सार्थकी लागलं अशी भावना आहे. कारण औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं, उस्मानाबादला धाराशीव दिले. ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. मी मुख्यमंत्री आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना भुखंड देण्याचं मान्य केलं. एखादी गोष्ट चांगली चालली की त्याला दृष्ट लागते. कुणाची ते तुम्हाला माहीत आहे.
शरद पवार सोनिया गांधींचे आभार
मला पवार साहेब आणि सोनियाजी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खास धन्यवाद द्यायचे आहेत. नामांतराचं सांगितलं. खेद एका गोष्टीचं वाटलं. या ठरावाच्या वेळी मी आदित्य सुभाष देसाई आणि अनिल परब चारच शिवसेनेचे मंत्री होते. बाकी सगळे मंत्री… तुम्ही जाणता. हा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस असो की राष्ट्रवादीने एका अक्षराने विरोध केला नाही. तातडीने मंजुरी दिली. त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांनी करून घ्ययाचं होतं ते नामानिराळे राहिले. दूर राहिले. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं गेलं ते सोबत राहिले.
I want to express my gratitude to the people of NCP and Congress that they supported me. From Shiv Sena, Anil Parab, Subhash Desai and Aaditya Thackeray, these people were only present when the proposal was passed while NCP & Cong people also supported the proposal: CM Thackeray pic.twitter.com/P02GV0i7f8
— ANI (@ANI) June 29, 2022
ज्यांना मोठं केलं ते विसरले – उद्धव ठाकरे
मी तुमच्याशी मनापासून बोलतोय. शिवसेनेला 56 वर्ष झाली. मी लहानपणापासून मी शिवसेना पाहतोय. रिक्षावाले, टपरीवाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल हातभट्टी वाले, त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. त्यांना नगरसेवक आमदार खासदार मंत्री बनवलं. मोठी झाली माणसं. मोठी झाल्यानंतर ज्यांना मोठं केलं ते विसरायला लागली. ज्यांना मोठं केलं त्यांना सत्ता आल्यानंतर जे काही देता येईल ते शक्य होतं ते दिलं. आजही ज्यांना देता येईल ते दिलं. ते लोकं नाराज. गेले चारपाच दिवस मातोश्रीला आल्यावर लोक येत आहे. साधी माणसं येत आहेत. साधी माणसं येत आहेत. साहेब काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. कमाल आहे. ज्यांना दिलं ते नाराज. ज्यांना नाही दिल ते ते सोबत आहे… हे हिंमतीने सोबत आहे. याला म्हणतात माणूसकी शिवसेना आणि याला म्हणतात शिवसैनिक, हे आपलं नातं आहे. त्या नात्याच्या जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हानं आली. पण या साध्या माणसाच्या साथीने परतवली आहे. आजही न्याय देवतेने निकाल दिला आहे. न्याय देवता म्हटल्यावर न्याय देवतेचा निकाल मान्य असायलाच पाहिजे. आपण आपली बाजू मांडली पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट, जसं कोरोना टेस्ट तसं. हा एक भाग. राज्यपाल महोदयांनी फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे. तो आदेश त्याचं पालनं करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यपालांना धन्यवाद. तुम्ही लोकशाहीचा मान राखलात. काही लोकांनी पत्रं दिल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्ही फ्लोअर टेस्ट करायला सांगितली. त्याच बरोबरीने त्यांना एक आठवण करून देतो. लोकशाहीचे पालन झालं पाहिजे. आम्ही करू , सर्वांनी करावी. 12 सदस्यांची यादी अडीच वर्ष लटकून आहे. ती मंजूर केली तर तुमच्या बद्दल चा आनंद द्विगुणित होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘माझ्या विरोधात एक जरी माणूस गेला तर माझ्यासाठी लज्जास्पद’
उद्या कोणी शिवसैनिकांनी अध्येमध्ये येऊ देऊ नका. उद्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे नातेवाईक मिलिट्री, पॅरा मिलिट्री असेल आजूबाजूच्या देशातील सैनिक असतील येऊ द्या. जल्लोषात झाला पाहिजे लोकशाहीचा जन्म. लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे. शिवसैनिकांनी त्यांच्या रस्त्यात येऊ नये. तुमच्या मार्गात कोणी येणार नाही. या घ्या शपथ. उद्या काय होणार. सेनेकडे किती आमदार आहेत भाजपकडे किती आहे. कसाला डोकी मोजायची. कामासाठी वापरायची नाही का. लोकशाहीत डोक्यांचा वापर मोजण्यासाठी होतोच. माझ्या विरोधात कोण आहे किती आहे. त्यात मला रस नाही. माझ्या विरोधात एक जरी माणूस गेला तर माझ्यासाठी लज्जास्पद आहे, असंही ठाकरे म्हणाले.
मला खेळच खेळायचा नाही – ठाकरे
उद्या तुम्ही बहुमत सिद्ध कराल. इतरांना सोबत घेऊन. मला त्यात रस नाही. मला खेळच खेळायचा नाही. ज्यांनी शिवसेनेने राजकीय जन्म दिला. शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं. साध्या शिवसैनिकांनी मोठं केलं. त्या शिवसेना प्रमुखाच्या पुत्राला मुखमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांच्या पदरात पडत असेल तर पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे. हे पाप माझं आहे. त्यापापाची फळं भोगावी लागत असेल तर त्यांचा काय दोष आहे. उद्या ते अभिमानाने सांगितली बघा शिवसेना प्रमुखांनी मला इथपर्यंत आणलं. पण त्याच्या पुत्राला आम्ही उतरवला की नाही, हे पुण्य घेऊन ते गावागावात हिंडतील हे त्यांचं पुण्य आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केलीय.