Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचे, त्यामागे अहमदभाई आहेत : उद्धव ठाकरे

अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसचा चाणक्य गेला, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. Uddhav Thackeray Ahmed Patel

काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचे, त्यामागे अहमदभाई आहेत : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 7:15 PM

मुंबई: काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसचा चाणक्य गेला, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. अहमद पटेल यांनी काँग्रेससाठी पदाची अपेक्षा न करता वाहून घेतले होते. पटेलांसारख्या दिग्गज नेत्याच्या जाण्यामुळं काँग्रेसचं मोठ नुकसान झालं आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये अहमद पटेल यांचे योगदान होते. त्यांच्या जाण्यानं मविआचेही नुकसान झालंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीनं करण्यात आलं होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. (Uddhav Thackeray said Congress lost his Chanakya due to demise of Ahmed Patel)

काँग्रेसच्या डावपेचांच्या मागे अहमदभाई

उद्धव ठाकरेंनी यावेळी अहमद पटेल यांच्यासोबतच्या संबंधावर भाष्य केले. अहमद पटेल यांच जाण्यानं मला 2 धक्के बसले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. “अहमद पटेलांविषयी माझ्याकडे असे काही किस्से नाहीत. मात्र, त्यांची कारकीर्द ही अहमदभाई काँग्रेस नेते म्हणून आणि मी सेना नेता म्हणून अशी राहिली, आम्ही विरोधात होतो.” काँग्रेस आणि सेना एकत्र येते, राजकीय नाते पुढे जाते आणि अचानक राजकीय आघात होतो, हे दुःखदायक आहे. बऱ्याच वेळा काँग्रेस डावपेच करायचे आणि आम्ही शोध लावायचो त्यावेळी कळायचे की यामागे अहमदभाई आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “अहमद पटेल यांची माझी फार पूर्वी एकदा भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की ऐसे होगा तो आगे कैसे होगा. मात्र, यातून अहमदभाईंनी मार्ग काढला.” उद्धव ठाकरेंनी अहमद पटेल यांच्याविषयी आणखी एक आठवण सांगितली.”एकदा मी घरी पोहोचलो होतो, रात्रीचे 12.15 वाजले होते, त्यांच्याकडून फोन करण्यास सांगितले होतं. मी उशिरा फोन केला तेव्हा सांगण्यात आलं की ते झोपले आहेत. तुम्ही रात्री 2 ते 2.30 दरम्यान फोन करा त्यांची अपॉइंटमेंट आहे. तेव्हा मला कळलं की ते कामाच्या बाबतीत किती तत्पर आहेत. (Uddhav Thackeray said Congress lost his Chanakya due to demise of Ahmed Patel)

घड्याळ न बघता काम करणारे असे ते नेते होते. अहमद पटेल यांच्या सारखी काम करणारी माणसं शोधून सापडणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी बनवताना अहमद पटेल यांनी चिंता करु नका म्हणून सांगितले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अहमद पटेल अनेकदा सरकार कसे चाललेय, ही विचारणा करण्यासाठी फोन करायचे. महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये अहमद पटेल यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्यानं महाविकास आघाडीचं मोठ नुकसान झालेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अहमद पटेलांनी कडक स्वरात लोकांसोबत संवाद साधला नाही: जावेद अख्तर

मी कुणी राजकारणी नाही किंवा राजकीय पक्षाचा सदस्य नाही. अहमद पटेल यांनी मला राज्यसभेचे सदस्य बनविले. आम्हा कलाकारांना काही अडचण होती, त्यावेळी अहमद पटेल यांन एकदा काम सांगितले की परत ते आम्हाला सांगायचे नाही किंवा आम्ही विचारायचो नाही. ते काम मात्र होऊन जायचं, असं जावेद अख्तर म्हणाले.

संबंधित बातम्या:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरद्वारे माहिती

महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची मोठी भूमिका, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

(Uddhav Thackeray said Congress lost his Chanakya due to demise of Ahmed Patel)

संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...