आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, जे मी बोललो तसंच घडलं होतं; उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा एकदा निशाणा
भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं.
मुंबई : शिवतीर्थावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, जे मी बोललो तसंच घडलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील शरसंधान केले. माझी बोटं हालत नव्हती. शरीर निश्चल पडलं होतं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा. कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा. हे कट करत होते.
हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. आपल्यासमोर येऊच शकणार नाही. हा उद्धव ठाकरे नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहीत नाही. आई जगंदंबेने मला जी शक्ती दिली असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्याच्याशी तुम्ही पंगा घेतला. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. एक तेजाचा शाप असतो. हा सर्व तेजाचा शाप आहे. विचित्र गोष्ट अशी की ज्यांना आपण सर्व काही दिलं. मंत्रीपद, आमदार खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले. ज्यांना दिलं नाही. ते माझ्यासोबत आहेत. हे माझं नशीब आहे.
ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची आहे. जोपर्यंत सोबत आहात. तोपर्यंत मी पक्षप्रमुख. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलेल गेट आऊट तर मी पदावरुन पाय उतार होईल. हे तुम्ही सांगावं गद्दारींनी नाही.
काय कमी केलं त्यांना. बाप मंत्री. कार्ट खासदार. कुणाचं आमदार. हे डोळे लावून बसलेत. नातू नगरसेवक. सर्व काही एकच. माझ्याचकडे पाहिजे. मी का मुख्यमंत्री झालो. का केली आघाडी. ही लपून ठेवण्याची गोष्ट नाही. भाजपने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली असे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगीतले.
मी हिंदुत्व सोडलं असेल. तुम्ही सांगा मी हिंदुत्व सोडलं. सोडलं मी हिंदुत्व. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सात जणांत त्याचाही मान राखला. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीवाले मांडीला मांडी लावून बसलेत दिसलं नव्हतं का. की स्वत:ची दाढी स्वत:च्या तोंडात गेली होती. का बोलला नाही तेव्हा? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.
अमित शहांसोबत ठरलं होतं. पण त्यांनी नकार दिला. मी शिवरायांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. जे मी बोललो तसंच घडलं होतं. भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं.
हे आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. आज तुम्ही केलं. तेच मी सांगत होतो. अडीच वर्ष तुमची अडीच वर्ष आमची. तेव्हा म्हणत होता हे संभव नाही. तेव्हा का सन्मानाने केले नाही.