मुंबई : आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी (Maharashtra Politics News) समोर येतेय! महाविकास आघाडी सरकार (MVA Government News) वाचवण्यासाठी शरद पवार मैदानात आलेत. उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde Breaking News) यांचं बंड आता शरद पवार हाताळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आणि पवारांची एका तासापासून बैठक सुरु होती. शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते अनिल देसाईंमध्ये बैठक सुरु होती. तासभर झालेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यानंतर आता शिवसेनेच्या आमदारांचं बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार नेमकी काय रणनिती वापरतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2019 मध्ये पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांचं बंडही फोडून काढण्याचा अनुभन शरद पवार यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
v
गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्मये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती यानंतर त्यांनी पत्रकार परिषददेखील घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केले. अडीच वर्ष सरकारने उत्तम काम केले. कोरोना काळात सरकारने चांगेल काम केले. यामुळे हे सरकार विधान भवनात बहुमतात (Majority) असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला होता.
तसेच मविआ सरकार टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करु, असं ते म्हणाले होते. सरकार बहुमतात आहे का नाही हे विधानसभेत (Vidhan Sabha) सिद्ध होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. विधानसभेत फ्लोअर टेस्ट केल्यावर कळेल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. काही गोष्टी झाल्या त्या नाकारता येणार नाहीत. जे आमदार बाहेर नेण्यात आले ते मुंबईत आल्यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही पवार म्हणाले.
वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE