Eknath Shinde vs Shiv Sena : धनुष्यबाण चिन्ह हवं पण उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नाही, एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात प्रथमच कबुली
कोर्टाने हरिश साळवे यांना तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाण्याचा उद्देश काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना हरिश साळवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या राजीनामान्यानंतर राज्यात अनेक घडामोडी सुरु आहेत. मुंबई महापालिका निवडणुकही जवळ आली आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह कुणाला मिळावे, यासाठी आम्ही तिथे गेलो.
नवी दिल्लीः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आमचा विश्वास आहे, मात्र त्यांच्याभोवतीची चौकडी त्रासदायक असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांनी वारंवार केलंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयीदेखील आमच्या मनात शंका नाही, असे शिंदे गटातील आमदार म्हणाले होते. मात्र आज प्रथमच सुप्रीम कोर्टात (Supreme court) शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करताना आम्हाला उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नसल्याचं कबूल केलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी आज सुप्रीम कोर्टासमोर बोलताना हा सर्व शिवसेना पक्षातील अंतर्गत प्रश्न असून यावर चर्चेची गरजच नाही. पक्षातील एका गटाला नेत्याचं नेतृत्व मान्य नसेल तर नेता बदलण्याचा अधिकार त्यांना नाही का, असा युक्तिवाद त्यांनी केला.
‘ठाकरेंचं नेतृत्व मान्य नाही’
सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरु झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरु केला. पक्ष नेत्याने बैठक बोलावली असतानाही गैरहजर असलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई का केली जाऊ नये? तसेच पक्षातील दोन तृतीयांश सदस्यांचा गट वेगळा निघाला म्हणजे संपूर्ण पक्ष असा अर्थ होत नाही. असे झाल्यास दहाव्या परिशिष्टाला अर्थ उरत नाही, असे कपिल सिब्बल म्हणाले. तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार, या लोकांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं हाच पर्याय असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. यावर हरिश साळवे यांनी आम्ही पक्ष सोडला नाही, त्यामुळे पक्षांतर बंदी कायदाच लागू होत नाही. तसेच पक्षातील एखाद्या गटाला नेतृत्व मान्य नसेल तर त्याने मतभेद व्यक्त करण्यास काय हरकत आहे? असा युक्तिवाद केला. वकील हरीश साळवे यांच्या याच वक्तव्यावरून एकनाथ शिंदे गटाला आता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नसल्याचं कोर्टासमोर स्पष्ट करण्यात आलं.
चिन्हावरून आज कोर्टात काय झालं?
शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील या वादात पक्षाचं चिन्हं कुणाकडे जाणार, याचाही निकाल कोर्टात लागण्याची शक्यता आहे. आज हरिश साळवे यांनी युक्तिवाद करताना माहिती दिली की, आम्ही पक्ष सोडला नाही. मात्र पक्षातील काही लोकांना नेतृत्व मान्य नाही. त्यानंतर कोर्टाने हरिश साळवे यांना तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाण्याचा उद्देश काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना हरिश साळवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या राजीनामान्या नंतर राज्यात अनेक घडामोडी सुरु आहेत. मुंबई महापालिका निवडणुकही जवळ आली आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह कुणाला मिळावे, यासाठी आम्ही तिथे गेलो. या प्रश्नासाठी निवडणूक आयोग आम्हाला महत्त्वाचा आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यानंतर