Shiv sena : ‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’ शिवसैनिकांची घोषणाबाजी! मुंबईत 144 कलम लागू, वाचा कुठे कसा राडा झाला?
Ekanth Sinde News : बंड पुकारलेल्या शिवसेना आमदारांविरोधात शिवसैनिकांनी हल्लाबोल केलाय.
वाढत्या राजकीय भूकंपामुळे तणावपूर्ण वातावरण आहे. याच पार्श्वभूमवीर मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये काही अपवादात्मक बाबींना सूट आहे. मात्र लाऊडस्पीकर वैगेरे इत्यादी बाबींवर बंदी आहे. मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. आमदार खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राजकीय बॅनरबाजी होणार नाही याकडेही विशेष लक्ष देण्यात आलाय. आंदोलन किंवा हिंसा होणार यांची याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक (Shiv sena crisis) असा संघर्ष आहे. याला कारण ठरलंय, शिवसेना आमदारांनी (Rebel Shiv sena MLA) पुकारलेलं बंड! या बंडामुळे बंड पुकारलेल्या शिवसेना आमदारांविरोधात शिवसैनिकांनी हल्लाबोल केलाय. गुरुवारपासून शिवसैनिक संतापलेत. जाणून घेऊयात याच संदर्भातल्या राजकीय (Maharashtra Politics) राड्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी.
- 1 पुणे : पुण्यातील एका शिवसैनिकाच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली. पुण्यामधील बालाजी नगर परिसरात असलेल्या सावंत यांचं कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं. ‘तानाजी सावंत हे मूळ शिवसैनिक नाहीतच. तानाजी सावंत कळीचा नारद असून या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा यावेळी तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांनी दिलाय.
- 2 उस्मानाबाद : खेकडा सावंत गद्दार असे लिहीत शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन करण्यात आलं. तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यल्यासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. तसंच सावंत यांच्या कार्यालयाला काळे फासले. सावंत यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यात रोष वाढलाय. तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केलाय.
- 3 मुंबई : एकनाथ शिंदेंविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी राज्यभर सुरुच आहे.. मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला, अरे एवढे सैनिक कशाला, गद्दाराला गाडायला, नाव घेता बाळासाहेबांचा कल्याण करता स्वलेकांचे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी राज्यभर केलीये.
- 4 कुर्ला : मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली. त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. चुनाभट्टीमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावरउतरून जोरदार घोषणाबाजी केली. आणि त्यांचे बॅनरही फाडले. तर इकडे दादरमध्येही सदा सरवणकरांच्या कार्यालयवर शिवसैनिकांनी हल्लाबोल केलाय.
- 5 गुवाहाटी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसाम येथील चार कार्यकर्त्यांनी गुवाहटी येथील हॉटेल रेडीसन ब्लू बाहेर घोषणाबाजी केलीय. हॉटेल पॅालीटीक्स बंद करा, आसाम मधून परत जा, अशी मागणी त्यांनी केलीय. या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही केलं. यानंतर आंदोलन राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
- 6 सुरक्षेवरुन वाद : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेत. या पार्श्वभूमीवर बंडखोर शिवसेना आमदारही धास्तावले असून सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचा राग एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमधून व्यक्त केलाय. या ट्वीटद्वारे एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा काढून घेण्यामागे राजकीय आकस असल्याचं म्हणत राज्य सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुरक्षा काढून घेण्यात आलेली नाही, असं म्हटलंय. बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
- 7 शिंदेच्या समर्थनात बॅनर : मुंबई, ठाण्यासह नाशिक पिंपळगाव आणि नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लागलेत. तर दुसरीकडे पुणे, औरंगाबाद, परभणीत शिवसेनेनं आंदोलन केलंय.
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे झालेल्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde News, Cm Uddhav Thackeray LIVE