उद्धव ठाकरे यांचं उद्या फेसबुक Live, निवडणूक आयोगाची पोलखोल करणार?

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' एवढेच सांगतो. तरुण रक्त पेटवलं आहे. संयम पाळलेला आहे. शिवसेनेचा तो राग खवळू देऊ नका.

उद्धव ठाकरे यांचं उद्या फेसबुक Live, निवडणूक आयोगाची पोलखोल करणार?
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 4:17 PM

मुंबई : शिवसेना पक्ष (Shivsena Party) आणि चिन्ह आपल्यापासून चोरून नेलं असलं तरीही त्यांची ही चोरी पचू देऊ नका. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी आज मुंबईत मातोश्री बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष हिरावून घेतल्यानंतर आता पुढची रणनीती काय, असा मोठा प्रश्न शिवसैनिकांसमोर आहे. अस्वस्थ झालेले कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळीदेखील पत्रकार परिषद घेतली. तर आज शनिवारी मातोश्री बंगल्याबाहेरील कलानगर चौकात ओपन जीपमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तर उद्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्या फेसबुक लाइव्ह…

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उद्या फेसबुक लाइव्ह करेल. निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं होतं, ते मी विस्ताराने सांगणार आहे… काँग्रेस फुटली त्यामुळे चिन्हं गोठवलं. पण दुसरं चिन्हं दिलं नव्हतं. वाद झाला तेव्हा मुख्य चिन्ह आणि नाव दिलं नाही. हा इतिहास आहे. पण पंतप्रधानांच्या गुलाम आयुक्तांनी केलं आहे. लढाई सुरू आहे…

निवडणूक आयोगाची पोलखोल?

केंद्र सरकारचे गुलाम होऊन निवडणूक आयोगाची मनमानी सुरु आहे, असा थेट आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. उद्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसेना पक्षाबाबत आयोगाने नेमका कशा रितीने वेगळा निर्णय दिलाय, यावरून उद्धव ठाकरे त्या आदेशाची चिरफाड करणार का, अशी चर्चा रंगू लागलीय.

राग खवळू देऊ नका…

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ एवढेच सांगतो. तरुण रक्त पेटवलं आहे. संयम पाळलेला आहे. शिवसेनेचा तो राग खवळू देऊ नका. तुम्हा सर्वांना मी पुढच्या सूचना देत जाईल. आज सुद्धा… तुम्ही कालचा फोटो पाहिलात का रे… माझा चेहरा कसा होता. ज्याच्या हातात धनुष्यबाण होतं त्याचा चेहरा कसा होता. त्याचा चेहरा मीच चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा चेहरा होता. ही चोरी पचू द्यायची नाही. आजपासून निवडणुकीच्या कामाला लागा…

शिवसेना कुणीही संपवू शकत नाही…

कलानगर चौकात येऊन भर चौकात मी का भाषण करतोय याचं कारण उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ते म्हणाले, ‘तुम्हाला एक सांगतो. मी तुम्हाला भेटायला आलो. आतमध्ये गर्दी मावली नसती. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलो आहे. शिवरायांचा भगवा घेऊन मी तुमच्यासोबत राहील. हीच शपथ घेऊन पुढे जाऊ या. शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहेत. तोपर्यंत कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही….

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.