महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा, 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश
महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांसह विविध नेते मंडळी उपस्थित (Maharashtra Vikas aghadi press conference) होते.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं (Maharashtra Vikas aghadi press conference) महाविकासआघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. नुकतंच या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार (Maharashtra Vikas aghadi press conference) पडली. यावेळी तिन्ही पक्षांच्या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून नाव देण्यात (Maharashtra Vikas aghadi press conference) आले. या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे, असा ठराव मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला एकमताने मंजूरी देण्यात आली. यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करतील असा प्रस्ताव मी मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील निवडून आलेल्या सर्व आमदारांनी या ठरावाला पाठींबा दिला.
ठराव एकमताने संमत झाला !
अभिनंदन उद्धवजी !
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 26, 2019
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी मा. उद्घव ठाकरे यांची निवड एकमताने करण्यात आली. त्यांचे हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/mdHSo4SSAk
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 26, 2019
या पत्रकार परिषदेनंतर महाविकासआघाडीचे नेते राजभवनात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई,अनिल देसाई ही नेतेमंडळी राजभवनावर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेले आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, धनजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफ्फुल पटेल तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, विजय वडेगट्टीवर, अबू आजमी यासारखे नेते राजभवनावर सत्तास्थापनाचा दावा करण्यासाठी गेले आहेत.
यानंतर आदित्य ठाकरे यांनी बाबतची माहिती सांगितली. आम्ही राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. येत्या 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शपथविधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपालांनी महाविकासआघाडीला 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा असे आदेश दिले आहेत.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari writes to Uddhav Thackeray stating,”as requested today orally,the oath of office&secrecy would be administered to you on Thursday, 28 November at 1840 hours at Shivaji Park, Dadar, Mumbai.” pic.twitter.com/ZbdA7qSkUW
— ANI (@ANI) November 26, 2019
राज्याला नवी दिशा देणारी ही आघाडी आहे. महाविकासआघाडी ही राज्याच्या हितासाठी असणार आहे. शेतकरी शेतमजूरांसाठी ही महाविकासआघाडी असेल. असे यावेळी शिवसेना नेत्यांनी बोलताना सांगितले. महाराष्ट्र विकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांसह विविध नेते मंडळी उपस्थित (Maharashtra Vikas aghadi press conference) होते.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आज महामहिम राज्यपाल मा. श्री. @BSKoshyari जी यांची भेट घेऊन संयुक्तरीत्या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याबाबत आपला दावा दाखल केला.
#MaharashtraVikasAghadi @AUThackeray pic.twitter.com/JItiOscPfA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 26, 2019
तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होईल. यासाठी महापालिकेला तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.
उद्धव मुख्यमंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?
दरम्यान, महाविकासाआघाडीकडून शिवसेनेचा मुख्यमंत्री तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं मिळणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोघे उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे.
राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावलं
राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र उद्या (27 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता बोलावलं आहे. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांचा शपथविधी पार पडेल. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सदस्यांना आमदारकीची शपथ देतील. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करावं लागेल.
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा राजीनामा
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं सांगितलं. त्यामुळे अवघ्या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले. बहुमतासाठी आवश्यक आमदार आमच्याकडे नाहीत त्यामुळे मी राजीनामा देतं आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.