Maharashtra Political Crisis: जे वाजपेयींनी केलं तेच उद्धव ठाकरे करणार? बहुमत चाचणीआधीच राजीनामा देणार? आता समारोपाच्या भाषणाकडे लक्ष

सन 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या भाषण केले. यानंतर भाषण संपताच आपण राजीनामा देत असल्याची घोषणा वाजपेयी यांनी केली होती. अगदी त्याचप्रमाणे उद्या विश्वासदर्शक मतदानाच्या आधीच किंवा शेवटच्या भाषणानंतर मुख्यमंत्री आपला राजीनामा सादर करतील , असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Political Crisis: जे वाजपेयींनी केलं तेच उद्धव ठाकरे करणार? बहुमत चाचणीआधीच राजीनामा देणार? आता समारोपाच्या भाषणाकडे लक्ष
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:27 PM

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात रान पेटले आहे. महाविकास आघाडी सरकराचा सत्ता संघर्ष आता निर्णयक टप्प्यावर येवून पोहचला आहे. बहुमत चाचणीच्या माध्यमातून ठाकरे सरकारला एक प्रकारची अग्नी परीक्षाच द्यावी लागणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीच्या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. अटबिहारी वाजपेयींनी (Atal Bihari Vajpayee)केलं तेच उद्धव ठाकरे करणार का? बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा(resign as Chief Minister) देणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे आता समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री काय बोलतात. राजीनाम्याची घोषणा करतात का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अटलबिहारी वाजपेयींचा कित्ता गिरवणार

सन 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या भाषण केले. यानंतर भाषण संपताच आपण राजीनामा देत असल्याची घोषणा वाजपेयी यांनी केली होती. अगदी त्याचप्रमाणे उद्या विश्वासदर्शक मतदानाच्या आधीच किंवा शेवटच्या भाषणानंतर मुख्यमंत्री आपला राजीनामा सादर करतील , असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक?

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यापासून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणास मान्यता देण्यासारखे काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. ही महाविकास आघाडी सरकारची शेवटची बैठक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा अर्थ देखील त्यांच्या राजीनाम्याशी जोडला जात आहे.

माझ्या सहकाऱ्यांनी मला दगा दिला, मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार

मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मला माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. पाच वर्षे हे सरकार चालणार असं म्हटलं होतं. पण, माझ्या सहकाऱ्यांनी मला दगा दिला. त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे भावनिक उद्गार यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

बंडखोर आमदारांचे पाठिंबा काढल्याचे पत्र

एकनाथ शिंदे गटातील 39 बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र सुप्रिम कोर्टात सादर केले आहे. याच पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणीची मागणी केली आहे.

वर्षा बंगला सोडल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांनी 22 जून रोजी वर्षा बंगला सोडला होता. मला कुठल्याही आमदाराने मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, मी एका मिनिटात राजीनामा देईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. यानंचर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत हल्लाबोल चढवला. बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता…, असे ट्विट आता त्यांनी केले होते.

समोर बसला तर मार्ग निघेल

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही सातत्याने उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र, बंडखोर एकनाथ शिंदे गट आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.