Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक, मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो, बंडखोर आमदारांना थेट आवाहन
मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले, 'शिवसैनिकांना आवाहन करतोय. ही बाळसााहेबांची शिवसेना राहिली नाही असा आरोप केला जात आहे. त्याला माझ्याकडे उत्तर आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व तयार करायला नालायक आहे. तर मी ते पदही सोडायला तयार आहे. शिवसेनाप्रमुखपदही सोडाला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही.
मुंबईः एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) तिकडे गेलेल्या आमदारांना मी एकच सांगतो. तुम्ही मला सांगाल. मुख्यमंत्रीपदी (Chief Minister) मी नकोय म्हणून, थेट बोललात तर मी आत्ता राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो.. असं भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिक आमदारांना दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे अनेक शिवसैनिक आमदार फुटल्याचं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदारांचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल केले जात आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकींनतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना जाहीर आवाहन केलं.
‘जोपर्यंत शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी भीत नाही’
जनतेला आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ हा कुठेही अगतिकपणा नाही. लाचारीचा प्रसंग नाही.मजबुरीत अजिबात नाही. आजपर्यंत असे अनेक आव्हाने आपण बिनसत्तेचे पेलले. हे काय मोठं आव्हान आहे. काय होईल जास्तीत जास्त. परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक आहे तोपर्यंत मी भीत नाही. मी आव्हानाला सामोरे जाणारा माणूस आहे. त्यामुळे मी घाबरून पाठ दाखवणारा नाही….
‘माझ्या माणसानं सांगावं… मी पद सोडेन’
मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसैनिकांना आवाहन करतोय. ही बाळसााहेबांची शिवसेना राहिली नाही असा आरोप केला जात आहे. त्याला माझ्याकडे उत्तर आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व तयार करायला नालायक आहे. तर मी ते पदही सोडायला तयार आहे. शिवसेनाप्रमुखपदही सोडाला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही. असे फडतूस लोकं खूप आहे. त्यांच्या सांगण्यावरून ट्विटर ट्रोलिंगवरून सांगणारे. मी त्यांना बांधिल नाही. मी माझ्या शिवसैनिकांना बांधील आहे. संकटाला सामोरे जाणारा माझा शिवसैनिक आहे. त्याने सांगावं, मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे.पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. त्याही पलिकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल तर तेही मला मान्य आहे. मला समोर येऊन सांगा. मी खूर्ची अडवून ठेवलीय ना. तुम्ही या समोरून सांगा. फोनवरून सांगा. आम्हाला संकोच वाटतोय. पण तुम्ही म्हणाला तसे आम्हाला तुम्ही नको असं सांगा. मी या क्षणाला मी मुख्यमंत्रीद सोडायला तयार आहे…