आदित्य दिल्ली बघणार अन् तुम्ही महाराष्ट्र बघणार असं काही ठरलंय का? मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली आहे. या दोन्ही राज्यात शिवसेनेची पुरेशी ताकद नसली तरी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा जोरदार प्रचार पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्ली बघणार आणि तुम्ही महाराष्ट्र असं काही ठरलं आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकसत्ताच्या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर उत्तर दिलं.

आदित्य दिल्ली बघणार अन् तुम्ही महाराष्ट्र बघणार असं काही ठरलंय का? मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 8:33 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली आहे. या दोन्ही राज्यात शिवसेनेची पुरेशी ताकद नसली तरी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा जोरदार प्रचार पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्ली बघणार आणि तुम्ही महाराष्ट्र असं काही ठरलं आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकसत्ताच्या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर उत्तर दिलं.

‘आदित्य त्याच्या वाटेनं पुढे जातोय’

‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्यावर कुणी राजकारण लादलं नाही. माझी राजकारणातील सुरुवात आदित्यसारखीच होत होती. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर, जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारही नाही. जर तुला जनतेनं स्वीकारलं तर तू तुझ्या वाटेनं पुढे जा. आता आदित्य त्याच्या वाटेनं पुढे जातोय. लोकांना पटलं तर ते त्याला स्वीकारतील. पक्ष आणि विचारही एक आहे. तो त्याच्या मार्गाने पुढे जातोय.

‘शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, कधी सोडणार नाही’

‘मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. त्याआधीही आमचे पूर्वज धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही आणि मला नाहीच येत. मला भाषण करता येत नाही हे तुम्ही लोकांनी ठरवून टाकलं हे बरंच झालं. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती तयार झाल्यावर शिल्पकाराचा मुलगा जर त्या शिल्पावर घाव घालत बसला तर ती मूर्ती तुटेल. मुर्ती तयार झाल्यानंतर तिच्यावर फुलं वाहायला हवी’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

भाजपसोबत पुन्हा युती होणार का?

‘ते ज्या पद्धतीनं चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीय का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला’, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावलाय. तसंच कुणी कुणाला बांधील नसतं. आपण कुणासोबत आघाडीत असलो, आणि तो पत्र चुकत असला तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल ते मला करणं भाग आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसनं भाकरी फिरवली, बीड जिल्हाध्यक्षपदावर राजेश्वर चव्हाण यांची निवड, इच्छुकांची प्रतिक्रिया काय?

अनिल देशमुखांना एक आणि नवाब मलिकांना वेगळा न्याय, लाड करण्याचं कारण काय? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.