Maharashtra Politics: संध्याकाळी 5 च्या बैठकीत काय घडणार? उद्धव ठाकरेंचं वर्षा बंगल्यावर आमदार-खासदारांना आमंत्रण!

महाविकास आघाडी सरकारवर आलेलं हे संकट, उत्तम राजकीय पटू असलेले शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे कसं दूर करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Politics: संध्याकाळी 5 च्या बैठकीत काय घडणार? उद्धव ठाकरेंचं वर्षा बंगल्यावर आमदार-खासदारांना आमंत्रण!
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:18 AM

मुंबईः महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर करण्यासाठी महाराष्ट्रात घमासान सुरु आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात आणि आसाममध्येही यासाठीची मोठी खलबतं सुरु आहेत. मात्र महाराष्ट्राची राजधानी मुंबईत महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी अखेरचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. अर्थात संध्याकाळी पाच वाजता ही बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वर्षा निवासस्थानापर्यंत येण्यासाठी आमदार आणि खासदारांना (ShivSena MLA and MP) पुरेसा वेळ देण्यात आल्याचं निश्चित आहे. तसंच सध्या आहेत त्यापेक्षा आणखी काही आमदारांची मनधरणी करण्यासाठीही या वेळात प्रयत्न केले जातील. महाविकास आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शर्थीचे प्रयत्न करत आहे.

उद्धव ठाकरेच्या निर्णयाकडे लक्ष

संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षी निवासस्थानावर शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकार पडण्याची स्थिती उद्भवल्यास पुढची रणनीती काय असेल, यावर चर्चा होईल. 45 आमदार माझ्यासोबत आहेत, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी खरंच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केला तर ठाकरे सरकारसाठी आता काऊंटडाऊन सुरु झालंय, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे ठाकरे आणि सहकाऱ्यांनी यासाठी मनाची तयारी केली असल्याचं दिसून येतंय.

काँग्रेस-राष्ट्रवादीत आज दुपारी चर्चा

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसदेखील अलर्ट मोडवर गेला आहे. वरिष्ठ नेतृत्वाने कमलनाथ यांना तडकाफडकी महाराष्ट्रातील राजकारणावर निरीक्षक म्हणून पाठवले आहे. आज दुपारी कमलनाथ आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातील घडामोडींना धरून इथे चर्चा होईल. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी सरकारवर आलेलं हे संकट, उत्तम राजकीय पटू असलेले शरद पवार कसं दूर करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.