माजी शिवसैनिक बाळू धानोकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार
यवतमाळ/वणी : “काँग्रेसचा जाहिरनामा घातक आहे. युतीच्या विजयात देशद्रोह्याचं एकंही मत नको, त्यांनी काँग्रेसला मतं द्यावीत”, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. ते यवतमाळमधील वणी इथे बोलत होते. यवतमाळमधील वणी हा भाग चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो. या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते हंसराज अहिर हे रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले बाळू धानोकर […]
यवतमाळ/वणी : “काँग्रेसचा जाहिरनामा घातक आहे. युतीच्या विजयात देशद्रोह्याचं एकंही मत नको, त्यांनी काँग्रेसला मतं द्यावीत”, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. ते यवतमाळमधील वणी इथे बोलत होते. यवतमाळमधील वणी हा भाग चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो. या लोकसभा मतदारसंघात भाजप नेते हंसराज अहिर हे रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले बाळू धानोकर यांचं आव्हान आहे. यावेळी माजी शिवसैनिक बाळू धानोरकरांविरोधात तर युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे, “काँग्रेसचा जाहिरनामा घातक आहे. युतीच्या विजयात देशद्रोह्याचं एकंही मत नको, त्यांनी काँग्रेसला मतं द्यावीत. स्थानिक उमेदवार दारु विकतो की दूध त्याला जे जमतं ते करतात. पण देश महत्त्वाचा आहे. पाठीमागून वार करणारी आमची औलाद नाही. युती झाली वाद संपला, आता दोन्ही पक्षात दुरावा नको. मतं मोजणीची औपचारिकता आहे, सरकार आपलंच येणार”
शेतकरी आत्महत्या
उद्धव म्हणाले, रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शिवसेनेमुळे 2008 ची कर्जमाफी झाली, त्याचा देशातल्या शेतकऱ्यांना फायदा झाला.
शेतकऱ्यांचं दुहेरी मरण आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, हे माहित आहे. मी भाजपाशी संघर्ष केला त्याचा मला आनंद आहे, माझ्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या, असं उद्धव म्हणाले.
म्हणून अमित शाह गैरहजर
भाजपच्या जाहिरनाम्यासाठी काल चंद्रपूर येथील अमित शहा यांची सभा रद्द झाली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ‘कालच्या सभेला गर्दी नाही’ अशी अफवा पसरवण्यापेक्षा मैदानात या, असं आव्हान त्यांनी दिलं.
युतीत खेचाखेची सुरु होती म्हणून हंसराज अहिर यांनी बोलावलं नाही आणि मी आलो नाही. पाच वर्षे सेना भाजपात धुसपूस होती, पण विरोधीपक्ष झोपला होता. आमचे मतभेद आम्ही गाडून टाकले, आता कोळशाचा घोटाळा करणाऱ्यांचं तोंड काळं करायचं आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंची केला.
राम मंदिर, कलम 370
राममंदिर बांधणार आणि 370 कलम काढणार, हे भाजपच्या जाहिरनाम्यात आहे. म्हणून मी मोदींसोबत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.