उद्धव ठाकरेंचे दौरे म्हणजे चार वर्षातलं पाप झाकण्याचा प्रयत्न : विखे पाटील

नाशिक : शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख सत्तेत असतानाही अयोध्या, पंढरपूर यानंतर वाराणसी अशा वाऱ्या करून चार वर्षातील आपले पाप झाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे नौटंकी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य […]

उद्धव ठाकरेंचे दौरे म्हणजे चार वर्षातलं पाप झाकण्याचा प्रयत्न : विखे पाटील
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

नाशिक : शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख सत्तेत असतानाही अयोध्या, पंढरपूर यानंतर वाराणसी अशा वाऱ्या करून चार वर्षातील आपले पाप झाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे नौटंकी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

परमपूज्य भगरी बाबा यांच्या 54 व्या पुण्यतिथीनिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यस्तरीय कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत सुरू आहे. यादरम्यान शेतकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लासलगाव डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. वाचा दुष्काळ ते राफेल, उद्धव ठाकरेंची मोदींवर चौफेर टीका

“शेतीमालाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राम मंदिर बांधण्यासाठी गेले हे एक मोठी अडचणीचं काम झाले आहे. राम मंदिर बांधायचे आहे, बांधू आपण, मात्र राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, तरुणांना रोजगार नाही, कर्जमाफी होत नाही, अशातच पंढरपूर येथे उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत जागावाटप गेली खड्ड्यात अशा सत्तेत राहण्याचे आम्हाला काही स्वारस्य नाही, पण ते सत्तेतूनही बाहेर यायला तयार का नाही?” असा सवाल विखे पाटलांनी केला.

अयोध्या, पंढरपूर आणि आता मोदींच्या मतदारसंघात वाराणसी येथे उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे. चार वर्षात युती सरकारचा अनुभव जनतेला आला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतीमालाला बाजारभाव नाही, तरुणांना रोजगार नाही, असे अनेक प्रश्न राज्य समोर असताना सरकारमध्ये असताना आलेलं अपयश झाकून जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला. चार वर्षात दिलेलं एकही आश्वासन पाळलं गेलं नाही. जनतेसाठी राजीनामे तुम्ही खिशात घेऊन फिरणारे मंत्र्यांनी अयोध्या येथे शरयु नदीमध्ये राजीनामे सोडून दिले की काय असाही प्रश्न पडला आहे. यावरून फक्त राजकारणात आपली इमेज वाढवण्याचा प्रयत्न दिसत आहे. हा सगळा प्रकार नौटंकी असल्याचं विखे पाटील म्हणाले.

कर्जमाफीमुळे बँका अडचणीत आल्याचं बोलले जात आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीमुळे बँका अडचणीत आल्या नसून निरोव मोदी, मल्ल्या यांच्यासह इतर उद्योजक 60 हजार कोटी रुपयांचा सरकारला चुना लावून पळून गेले आहे. त्यामुळे बँका अडचणीत आहेत. देशातील 12 ते 13 उद्योगपतींकडे 12 ते 13 लाख कोटींचा एनपीए थकलेला आहे. शेतकऱ्यांना एक किंवा दोन लाख कोटींची कर्जमाफी देण्याची वेळ आली तर कोणत्या बँका अडचणीत आल्या? शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी नियम लावले जातात. व्यापाऱ्यांसाठी कोणतेही नियम नाहीत, त्यामुळेच बँका अडचणीत आल्यात, असंही विखे पाटील म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.