CM Uddhav Thckeray : “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, बाळासाहेबांचं नाव वापरणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडसावलं
Eknath Shinde : आज शिवसनेची राष्ट्रीय कारकारिणी बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिल आहे.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नाव वापरणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडसावलं. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरेंकडेच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. “मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही. हिंमत असेल तर स्वताच्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) यांनी म्हटलंय.
“बाळासाहेबांचं नाव वापराल तर याद राखा”
आज शिवसनेची राष्ट्रीय कारकारिणी बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिल आहे. “हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा. बाळासाहेबांचं नाव कुणालाही वापरता येणार नाही. बाळासाहेबांचं नाव वापराल तर याद राखा”, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिंदे गट आता ‘शिवसेना बाळासाहेब गट’
मागच्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा आज क्लायमॅक्स समोर आला आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने आपलं अधिकृत नाव जाहीर केलं आहे. ‘शिवसेना बाळासाहेब गट’ , असं या गटाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह केलं. यात बाळासाहेबांचं नाव न घेता जगून दाखवावं, असं खुलं आव्हान शिंदे गटाला दिलं आहे. अन् आता शिंदे गटाने आपलं नाव’शिवसेना बाळासाहेब गट’ केल्याचं समोर आलं आहे. यावरूनच आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे.