भाजपच्या महापौरांकडून राष्ट्रवादीचा प्रचार, पक्षाविरोधी काम केल्याने कारणे दाखवा नोटीस
उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर पंचम कलानी यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली (BJP mayor pancham kalani show cause notice) आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर पंचम कलानी यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पक्षाविरोधी काम केल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात (BJP mayor pancham kalani show cause notice) आली आहे.
उल्हासनगर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी या भाजपाच्या महापौर पंचम कलानी यांच्या सासुबाई आहेत. पंचम यांनी सासुबाईच्या प्रचारात उघड उडी घेतली आहे. त्यामुळे पंचम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपाचे पालिकेतील गटनेते जमनु पुरस्वानी यांनी ही नोटीस पाठवली आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी आणि महापौर पंचम कलानी यांच्यात उमेदवारीची चढाओढ होती. पंचम यांना उमेदवारी मिळणार असे सांगण्यात येत होते. सुनेच्या प्रचाराच्या वेळी अडचण नको म्हणून ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र भाजपाचे पंचम कलानी यांना अखेरपर्यंत उमेदवारीसाठी झुलवत ठेवले. त्यानंतर अखेर कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब (BJP mayor pancham kalani show cause notice) झाले.
त्यामुळे ज्योती कलानी यांनी रातोरात राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळवला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांचा उमेदवारी अर्ज भरताना, तसेच प्रचारात भाजपच्या महापौर पंचम कलानी सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेतही पंचम यांनी पाठ फिरवली होती.
दरम्यान या नोटीसबाबत पंचम यांना विचारले असता, मला अजून नोटीस मिळाली नाही असेही त्यांनी सांगितले. जरी ती नोटीस मिळाली तर ती फाडून त्यांच्या तोडांवर मारेन अशी प्रतिक्रिया महापौर पंचम यांनी दिली आहे. तसेच मी राष्ट्रवादीचाच प्रचार करेन असे ही त्या म्हणाल्या.