Umc election 2022 Ward 22 : 22 नंबर प्रभागात भाजपाचा बोलबाला, राजकीय स्थितीचा यंदा नेमका फायदा कोणाला?

महापालिकेत सत्ता जरी महाविकास आघाडीची असली तरी प्रभाग 21 आणि 22 मध्ये मात्र, भाजपाच्या उमेदवाराला 2017 च्या निवडणुकीत निवडूण देण्यात आले होते. त्यामुळे यंदा राज्यात झालेल्या राजकीय बदलाचा फायदा भाजपाला होणार की महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट होणार हे पहावे लागणार आहे. या वर्डातून भाजपाच्या सरोजिनी मुरलीधर टेकचंदानी ह्या गतवेळी निवडुण आल्या होत्या.

Umc election 2022 Ward 22 : 22 नंबर प्रभागात भाजपाचा बोलबाला, राजकीय स्थितीचा यंदा नेमका फायदा कोणाला?
उल्हासनगर महापालिका
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 1:46 PM

उल्हासनगर : राज्यातील (Politics) राजकारण हे ढवळून निघाले असतानाच आता पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनाही आपले अस्तित्व दाखवून द्यावे लागणार आहे. 2017 च्या (Municipal Election) महापालिका निवडणुकीनंतर येथील महापालिकेवर (MVA) महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. असे असले तरी प्रभाग क्रमांक 21, 22 मध्ये मात्र भाजपाचे नगरसेवक आहेत. गतवेळची निवडणुक ही वार्डनिहाय होती. त्यामुळे अटीतटीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. महापालिकेतील वार्ड क्रमांक 22 मध्ये भाजपाचा बोलबाला आहे. असे असले तरी दुसरीकडे राज्यात भाजपाला सोबत घेऊन शिंदे सरकारही अस्तित्वात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र निवडणुक लढवण्याचे ठरवले तरी राज्यात आणि केंद्रात झालेल्या बदलाचा परिणाम महापालिका निवडणुकांवर कसा होतो हे पाहणे महत्वाचे आहे.

उल्हासनगर महापालिकेचे चित्र

उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5 लाख 06 हजार 098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2 लाख 69 हजार 048 एवढी असून पुरुषांची संख्या 2 लाख 37 हजार 050 एवढी आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे.

प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे नगरसेवक

महापालिकेत सत्ता जरी महाविकास आघाडीची असली तरी प्रभाग 21 आणि 22 मध्ये मात्र, भाजपाच्या उमेदवाराला 2017 च्या निवडणुकीत निवडूण देण्यात आले होते. त्यामुळे यंदा राज्यात झालेल्या राजकीय बदलाचा फायदा भाजपाला होणार की महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट होणार हे पहावे लागणार आहे. या वर्डातून भाजपाच्या सरोजिनी मुरलीधर टेकचंदानी ह्या गतवेळी निवडुण आल्या होत्या. उल्हासनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता असली तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये मात्र, भाजपाला यश मिळाले होते. 2017 मध्ये वार्ड पद्धतीने निवडणुका पार पडल्या होत्या. आता प्रभागनिहाय निवडणुका होणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून तयारी सुरु झाली असली प्रत्यक्ष निवडणुका केव्हा होणार हे अद्यापही निवडणुक आयोगाने स्पष्ट केलेले नाही.

प्रभाग क्रमांक 22 चे असे आहे चित्र

वार्डनिहाय होणारी महापालिकेची निवडणुक आता प्रभागनिहाय पार पडत आहे. महापालिकेवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असली तरी प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे कमळ फुलले होते. या वार्डातून सरोजिनी मुरलीधर टेकचंदानी ह्या निवडुण आल्या होत्या. प्रभागाची लोकसंख्या ही 15 हजार 794 एवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीचे 2 हजार 291 तर अनुसूचित जमातीचे 283 असे मतदार आहेत. निवडणुक आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रभाग हद्द, आरक्षण हे घोषित झाले असले तरी निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांचे बाशिंग हे गुडघ्यालाच आहे. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला की निवडुकांचा धुरळा उडणार हे मात्र निश्चित. या वार्डाचे नेतृ्त्व आतापर्यंत भाजपाच्या सरोजिनी मुरलीधर टेकचंदानी ह्या करीत होत्या.

प्रभागाची व्याप्ती

प्रभाग क्रमांक 22 ची व्याप्ती निवडणुकांच्या अनुशंगाने महत्वाची आहे. शहरातील रेल्वे ट्रक, वाको कंपाऊंड एरिया, बंजारा कॉलनी, सुर्या हॉटेल महादेव नगर, संतोष नगर, वासिटा कॉलनी, गीता कॉलनी, शिव कॉलनी, मिलिंद नगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, डॉ. वाणी दवाखाना परिसर, पार्वती अपार्टमेंट, एपीएमसी कार्यालय, यशवंत विद्यालय मार्ग याचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. एरियावरच उमेदवराचे भवितव्य देखील अवलंबून आहे.

उल्हासनगर महापालिका प्रभाग 22 ‘अ’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

उल्हासनगर महापालिका प्रभाग 22 ‘ब’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
शिवसेना
मनसे
इतर

उल्हासनगर महापालिका प्रभाग 22 ‘क’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षणाचे स्वरुप असे

आरक्षणावरही उमेदवराचे भवितव्य अवलंबून राहते. महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागातील आणि प्रभागाच्या वार्डातील आरक्षण जाहिर केलेले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 22 मधील वार्ड अ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग राखीव असणार आहे. तर ब मध्ये सर्वसाधारण महिला मध्ये यासाठी आरक्षण आहे. तर क प्रभागत सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.