Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election 2022 Ward No 19 | निवडणुकीपूर्वीच भाजपवर राष्ट्रवादीची कुरघोडी, आता निवडणुकीत कोण मारणार बाजी

UMC Election 2022 Ward No 19 | उल्हासनगरात पप्पु कलानी यांचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीने सूत्र हाती घेतली. भाजपानंतर त्यांनी आता हातावर घड्याळ बांधलं आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

UMC Election 2022 Ward No 19 | निवडणुकीपूर्वीच भाजपवर राष्ट्रवादीची कुरघोडी, आता निवडणुकीत कोण मारणार बाजी
भाजपला राष्ट्रवादीचे आव्हानImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 11:39 AM

UMC Election 2022 Ward No 19 | उल्हासनगरात पप्पु कलानी यांचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीने सूत्र हाती घेतली. भाजपानंतर त्यांनी आता हातावर घड्याळ बांधलं आहे. त्यामुळे महापालिकेची ((Ulhasnagar Municipality) निवडणूक रंगतदार ठरणार आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत सत्तेचा महामेरु सहज पार केला. तर त्याचदरम्यान भाजपशी (BJP) नाते तोडत कलानी यांच्या सूनेसह इतर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)जवळ केली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या खेळीमुळे सर्वच आघाड्यावर जोशात असलेली भाजप उल्हासनगरात मात्र बॅकफुटवर आली. तसं तर हे कामगारांचं शहर. देशभरातील कानाकोपऱ्यातील कामगार या ठिकाणी आलेत आणि त्यांनी चीनसारखं मार्केट सार्वजनिक करुन टाकलं. कोणत्या ही गोष्टीची हुबेहुब दुसरी कॉपी करण्यात उल्हासनगर जगात सर्वात पुढचे शहर आहे. भाजपच्या मदतीने शिवसेनेतील (Shivsena) आमदारांनी बंड केल्यानंतर लागलीच या शहरानं ही बंडाची कॉपीच केली नाही तर अंमलबजावणी ही केली आहे. आता येणारी महापालिका निवडणूक अजून काय रंगत दाखवते ते लवकरच कळेल.

पप्पु कलानी यांचा करिष्मा या शहरावर कायम आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणाची सूत्र हाती घेतली आहे. 2017 मधील निवडणुकीत या पालिकेत एक करिष्मा झाला होता. सर्वाधिक नगरसेविका निवडून येण्याची किमया याच महापालिकेत घडली होती. एकूण 78 नगरसेवकांपैकी 47 नगरसेविका या महिला होत्या. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने 33 नगरसेवक निवडून आणले होते. त्यापैकी 21 महिला नगरसेवक निवडून आल्या होत्या. त्यामुळे यावेळी पुन्हा महिला राज दिसून येईल का? भाजपला शहा काटशहा देण्यात राष्ट्रवादी यशस्वी होईल का? याकडे मतदारांचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर महापालिकेची सध्यस्थिती

उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 36 जागा राखीव आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग आहेत. उल्हासनगरची लोकसंख्या 5,06,098 एवढी आहेत. त्यात महिलांची संख्या 2,69,048 एवढी असून पुरुषांची संख्या 2,37,050 एवढी आहे. वॉर्ड क्रमांक 19 ची एकूण लोकसंख्या 18,381 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीचे 6812 तर अनुसूचित जमातीचे 301 जणांचा समावेश आहे.

वॉर्ड क्रमांक 19 आरक्षण

वॉर्ड क्रमांक 19 अ अनुसूचित जाती वॉर्ड क्रमांक 19 ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला वॉर्ड क्रमांक 19 क सर्वसाधारण

यापूर्वी वॉर्ड क्रमांक 19 मधून निवडून आलेले सदस्य

वॉर्ड क्रमांक 19 अ किशोर नारायणदास बनवारी भाजप

वॉर्ड क्रमांक 19 ब मीना चंद्रगुप्त सोनेजी भाजप

वॉर्ड क्रमांक 19 क मीनाक्षी रवी पाटील भाजप

वॉर्ड क्रमांक 19 ड विजय चाहू पाटील भाजप

वॉर्ड क्रमांक 19 मधील परिसर कोणता?

स्मशानभूमी परिसर, ब्राम्हण पाडा, संभाजी चौक परिसर, राहुल नगरचा काही भाग, मालेगाव मटन शॉप परिसर, महात्मा फुले कॉलनी, हॉली फॅमेली स्कूल परिसर, सार्वजनिक मित्र मंडळ परिसर, गुरुद्वाराजवळील परिसर, रेल्वे लगतचा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी परिसर, दहाचाळ परिसर, सिद्धार्थ कॉलनी

पक्षउमेदवारविजयी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
इतर
पक्षउमेदवारविजयी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
इतर
पक्षउमेदवारविजयी
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
अपक्ष
इतर

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.