Amit Shah : राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी काँग्रेसचे प्रदर्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून आपला अजेंडा पूर्ण करत आहे. आज ईडीनं रेड टाकली नाही. काहीही झालं नाही, तरीही काँग्रेसनं विरोध केला.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रदर्शनावर काँग्रेसला (Congress exhibition) धारेवर धरले. आज ईडीकडून कुणाचीही चौकशी (no inquiry from ED) झाली नाही. मग, काळ्या कपड्यात काँग्रेसनं विरोध का केला. काँग्रेसनं कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करायला हवं. आत्मसंतुष्टिची राजनीती काँग्रेस करत असल्याचा आरोप शहा यांनी केला. पाच ऑगस्टला राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन (Bhoomipujan of Ram temple work) झालं. त्या दिवशी दोन वर्षांपूर्वी काँग्रेस प्रदर्शन करत होती. काळे कपडे घालून विरोध करण्याचं कारण काय, असा सवाल करत काँग्रेसनं कायदा, सुव्यवस्थेला साथ दिली पाहिजे, असं सुनावलं.
काँग्रेसने एजन्सीच्या कारवाईविरोधात केलं विरोध प्रदर्शन
काँग्रेसनं काळ्या कपड्यात दिल्लीत विरोध प्रदर्शन केलं. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेसचे नेते काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले. काँग्रेसचा हा विरोध पक्षाच्या नेत्यांविरोधात होत असलेल्या एजन्सीजच्या कारवाईवर होता. परंतु, अमित शहा यांनी या विरोध प्रदर्शनाला राम मंदिर निर्माणच्या तारखेशी जोडला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन केलं.
#WATCH | Congress chose this day for protest and wore black clothes because they want to give a subtle message to further promote their appeasement politics because on this day itself Prime Minister Modi laid the foundation of Ram Janambhoomi: Union Home minister Amit Shah pic.twitter.com/hopwRSPZht
— ANI (@ANI) August 5, 2022
काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा वाढविली
गेल्या काही दिवसांत यंग इंडियाचे कार्यालय सील करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली. काँग्रेस मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत पाच ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला.
आंदोलन करण्याचं कारण काय?
यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा म्हणाले, काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून आपला अजेंडा पूर्ण करत आहे. आज ईडीनं रेड टाकली नाही. काहीही झालं नाही, तरीही काँग्रेसनं विरोध केला. आज आंदोलन करण्याचं कारण काय, असं अमित शहा म्हणाले. आज काळ्या ड्रेसमध्ये काँग्रेसचे नेते दिसले. आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे वर्ष जुन्या राम मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं. राम मंदिराच्या बांधकामाला विरोध करत असल्याचा संदेश काँग्रेसनं या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्याचं त्यांनी सांगितलं.