पाकव्याप्त काश्मीरही आमचाच, जीवाचं रान करेन : अमित शाहांची गर्जना
अमित शाह (Amit Shah) म्हणाले, “काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च सभागृह आहे. कश्मीरच्या संविधानातही याची स्पष्टता नाही. कश्मीरप्रश्नी वेळप्रसंगी प्राणाच बलिदान देऊ. काश्मीरच्या सीमेमध्ये पाकव्याप्त काश्मीरही येतं. त्यासाठी जीवही देऊ”
Jammu Kashmir Article 370 नवी दिल्ली : “जम्मू काश्मीरमध्ये केवळ काश्मीर नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. तो सुद्धा भारताचाच भाग आहे. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, पण पाकव्याप्त काश्मीरही आमचाच”, अशी गर्जना गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केली. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याची घोषणा राज्यसभेत केल्यानंतर, आज अमित शाहांनी लोकसभेत निवेदन दिलं.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च आहे. काश्मीरबाबत नवे कायदे आणि संविधानात बदल करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ज्यावेळी मी जम्मू काश्मीर असा उल्लेख करतो, त्यावेळी त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन अर्थात चीनव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. हे दोन्हीही भाग भारताचाच हिस्सा आहे, असं अमित शाहांनी ठणकावून सांगितलं.
अमित शाह (Amit Shah) म्हणाले, “काश्मीरसाठीही संसदच सर्वोच्च सभागृह आहे. कश्मीरप्रश्नी वेळप्रसंगी प्राणाच बलिदान देऊ. काश्मीरच्या सीमेमध्ये पाकव्याप्त काश्मीरही येतं. त्यासाठी जीवही देऊ”
Union Home Minister Amit Shah in Lok Sabha: Jammu & Kashmir is an integral part of Union of India. Kashmir ki seema mein PoK bhi aata hai…Jaan de denge iske liye! https://t.co/7zyF4I0eQn
— ANI (@ANI) August 6, 2019
काँग्रेसचा सेल्फ गोल
दरम्यान, लोकसभेत काश्मीर मुद्द्यावरुन काँग्रेसने एकप्रकारे सेल्फ गोल केला. खासदार अधीर रंजन यांनी जम्मू कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात प्रलंबित असल्याचं नमूद करताच, काँग्रेसवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.
Adhir Ranjan Chowdhury, Congress, in Lok Sabha: You say that it is an internal matter. But it is being monitored since 1948 by the UN, is that an internal matter? We signed Shimla Agreement & Lahore Declaration, what that an internal matter or bilateral? pic.twitter.com/UPLd8BgwS6
— ANI (@ANI) August 6, 2019
अमित शाह यांनीही त्याला उत्तर देत, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्याबाबत संयुक्त राष्ट्राने ढवळाढवळ करावी असं तुम्हाला का वाटतं, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला.
LIVETV जम्मू काश्मीर विधानसभेत चर्चेपूर्वी विभाजनाचा निर्णय कसा घेतला, काँग्रेसचा सवाल, विभाजनाला विरोध https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/q5pSjNWiD7
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2019
काश्मीरबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे, असं शाहांनी नमूद केलं. त्यावेळी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सरकारने नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं. मग अमित शाहांनी कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं ते सांगा, अशी विचारणा केली.
याप्रसंगी गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
Lok sabha LIVE