अखेर अमित शाहांच्या बॅगेचीही तपासणी, नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतल्यानंतर बॅग चेकिंगचा मुद्दा चांगलाच तापला होता, याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे.

अखेर अमित शाहांच्या बॅगेचीही तपासणी, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 3:20 PM

मोठी बातमी समोर येत आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. हिंगोलीतील प्रचार सभेला जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी यावरून भरसभेत भाजपवर हल्लाबोल केला होता. अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅगेची तपासणी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

अखेर निवडणूक आयोगाकडून केंद्रीय गृहमंत्री अमितच शाह यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. हिंगोलीतील प्रचार सभेला जात असताना निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. हिंगोलीच्या प्रचार सभेत अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी 

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी प्रचार सभेला जात असताना हेलीपॅडवरच उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. निवडणूक आयोगाचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगेची तपासणी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. सोबतच एका अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॅग चेक केली त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. तर दुसरीकडे सोलापुरात पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांची प्रचार सभा असल्यानं उद्धव ठाकरे यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली होती. यावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅगेचीही निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.