MP Navneet Rana Y security: नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान, VVIP श्रेणीत समावेश
खासदार नवनीत राणा यांना मिळणार वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच मिळणार आहे. आता खासदार नवनीत राणा यांचा व्हीव्हीआयपी (अति महत्वाच्या व्यक्ती) श्रेणीमध्ये समावेश होणार आहे.
मुंबईः खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा (y plus security) प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या निर्देशानुसार वाय प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान केली गेली आहे. संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच असणार आहे. आता खासदार नवनीत राणा यांचा व्हीव्हीआयपी (अति महत्वाच्या व्यक्ती) या श्रेणीमध्ये त्यांचा समावेश होणार आहे. नवनीत राणा यांच्या सोबत हे सुरक्षा पथक चोवीस तास असणार आहे. त्यांच्याकडून राज्य सरकार आणि इतर बाबींबर नेहमीच कडाडून टीका केली जाते. त्या खासदार असल्याने अनेक ठिकाणी त्यांना फिरावे लागते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सुरक्षा पथकाचा ताफा
केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजी कमांडो, सी एसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. आता 24 तास हे सुरक्षा पथक खासदार नवनीत राणा यांच्याबरोबर असणार आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून अहवाल
खासदार नवनीत रवी राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढत असतात. देशातील अनेक गंभीर प्रश्नांना त्या वाचा फोडतात, सोबतच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात त्यामुळे त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून गृहमंत्रालयाला देण्यात आला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने खासदार नवनीत राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक आज दुपारी अमरावतीत दाखल होत असून त्यामध्ये एकूण 11 कमांडो असणार आहेत.
नेहमीच सुरक्षेच्या गरड्यात
राज्य सरकारच्या कारभारावर त्यांच्याकडून नेहमीच ताशेरे ओढेल जाताता, त्याच बरोबर देशातील कोणत्याही मुद्यावर त्या थेट पणे बोलत असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना नेहमीच सुरक्षेच्या गरड्यात राहावे लागणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एस पी ओ ,एन एस जी चे कमांडो,सी एस एफ चे बंदुकधारी जवान, शासकीय पायलट कार असा त्यांच्या सुरक्षेचा ताफा असणार आहे.
संबंधित बातम्या
Osmanabad Photo | येडशीच्या तरुणाची महामानवाला आदरांजली, गावात साकारले भले मोठे फायर पेंटिंग
Jayant Patil : राज ठाकरेंची सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा! जयंत पाटलांचा जोरदार टोला