गणपती दर्शनानंतर जवळ बोलवलं आणि कानात… अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना नक्की काय सांगितलं?
लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाह यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्य्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या गणपती दर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना जवळ बोलवलं.
Amit Shah-Devendra Fadnavis Meeting : नवसाला पावणारा राजा आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजाचे दर्शन हजारो भाविक घेत असतात. आता नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते. यानंतर अमित शाह यांनी आशिष शेलार यांच्या गणपती मंडळाचे दर्शन केले. यानंतर आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीतरी गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई दौऱ्यानिमित्त आलेल्या अमित शाह यांनी आज दिवसभर विविध ठिकाणी गणपतीचे दर्शन घेतले. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर अमित शाहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर असलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर अमित शाह हे सहकुटुंब यांनी आज सोमवारी ९ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अमित शाहांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. तसेच त्याच्या चरणावर हळद, कुंकू आणि फुलेही वाहिली. यानंतर बाप्पााच्या चरणावर डोकं ठेवत आशीर्वाद मागितला.
कोणत्या विषयावर चर्चा झाली?
लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाह यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्य्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या गणपती दर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना जवळ बोलवलं. त्या दोघांमध्ये काही गोष्टींबद्दल चर्चा झाली. आता या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गणपती दर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल सध्या उत्सुकता पाहायला मिळत आहे.
अमित शाह दोन दिवस मुंबई दौऱ्यावर
गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीतील नेत्यांना चांगलेच खडसावले. तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभेत करणं टाळा, अशी सूचना अमित शाह यांनी केली.