केंद्रीय मंत्री Narayan Rane लिलावती रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडे कामाचा मोठा अवाका असतो. राणे यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास जाणावत होता. पण, आज अचानक त्रास पुन्हा जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले.
भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना नुकतेच मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक ह्रदयाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रू्ग्णालयात दाखल करण्यात आले.ह्दयाचा त्रास होत असल्याने त्यांना तत्काळ लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले.लीलावती रूग्णालयात त्यांच्यावर ऍजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. नारायण राणे यांच्यावर केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडे कामाचा मोठा अवाका असतो. राणे यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास जाणावत होता. पण, आज अचानक त्रास पुन्हा जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले.
Published on: May 27, 2022 01:30 PM