भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडर, ‘वॉशिंग युद्धा’त दानवेंची उडी

भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडर आहे, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपला सवाल विचारणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं

भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडर, 'वॉशिंग युद्धा'त दानवेंची उडी
Follow us
| Updated on: Aug 29, 2019 | 1:07 PM

जालना : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यामध्ये वॉशिंग पावडरवरुन कलगीतुरा रंगलेलं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उडी घेतली आहे. भाजपकडे वॉशिंग मशिन (Washing Machine) आणि गुजरातची निरमा पावडर (Nirma Powder) आहे, असं म्हणत दानवेंनी विरोधकांना चपराक लगावली.

भाजप आणि विरोधकांमध्ये सध्या ‘धुलाई युद्ध’ रंगलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. कोणालाही पक्षात घेण्याआधी आम्ही त्यांना मशिनमध्ये धुवून घेतो. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उत्तर दिलं. ‘गुजरातची निरमा पावडर’ असा साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख दानवेंनी केला होता. रावसाहेब दानवे जालन्यामध्ये बोलत होते.

सुप्रिया सुळेंचा टोमणा

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची फिरकी घेतली होती. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दबावतंत्रासाठी वापर सुरु आहे. आमच्याकडे असताना वाईट असलेले, त्यांच्याकडे गेल्यावर चांगले होतात, भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे? असा सवाल त्यांनी विचारला होता.

वॉशिंग पावडर नाही, डॅशिंग रसायन

सुप्रिया सुळेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं होतं. ‘राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नेत्यांना वॉशिंगची गरज आहे, हे सुप्रिया सुळे यांनी मान्य केल्याबद्दल आभार. भ्रष्टाचाराची भरपूर घाण तयार झाली आहे. मात्र भाजप वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. त्या रसायनापुढे सारं काही निष्प्रभ आहे. आणि मोदीजींसारखा नेता आहे’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला होता.

मुख्यमंत्र्यांना सुळेंचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांनी डॅशिंग केमिकल म्हटलंय पण सर्वच रसायनं चांगली नसतात, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे रसायनांची मला चांगली माहिती आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी सावध राहावं. भाजपवाले रसायनांची पावडर टाकत आहेत. रसायनातून काय-काय होतं, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे सांभाळून राहा, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.

उद्धव ठाकरेंचाही टोला

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हा ‘आमच्याकडे कोणतीही वॉशिंग पॉवडर नाही’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेचं काम पाहून अनेक नेते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

भाजपकडे वॉशिंग पावडर नाही, विकासाचं डॅशिंग रसायन, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.