अनिल गोटेंच्या गाडीवर दगडफेक

धुळे : धुळे शहरात महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र ऐन निवडणुकीदरम्यान आमदार अनिल गोटेंच्या गाडीवर अज्ञाताने शनिवारी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात गोटे समर्थकांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. ही घटना धुळ्यातील कल्याण भवन परिसरात घडली. या घटनेनंतर गोटे यांची प्रकृती बीघडली होती. मात्र सकाळी गोटे यांना उपचार्थ रुग्णलयात दाखल करण्यात आलं […]

अनिल गोटेंच्या गाडीवर दगडफेक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

धुळे : धुळे शहरात महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र ऐन निवडणुकीदरम्यान आमदार अनिल गोटेंच्या गाडीवर अज्ञाताने शनिवारी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात गोटे समर्थकांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. ही घटना धुळ्यातील कल्याण भवन परिसरात घडली. या घटनेनंतर गोटे यांची प्रकृती बीघडली होती. मात्र सकाळी गोटे यांना उपचार्थ रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.

काल रात्री प्रचार थांबल्यानंतर गोटे आपल्या कार्यलयाजवळ कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले असता, बाईकवरुन आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यातून त्यांच्या गाडीची पुढची काच फुटली आहे. सुदैवाने गोटे त्या गाडीत नव्हते, मात्र घटनेनंतर गोटेंची प्रकृती बिघडली होती. या घटनेमुळे कल्याण भवन स्थित त्यांच्या कार्यलयाजवळ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान घटना स्थळी पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे पोहोचले आणि त्यांनी वातावरण शांत केलं.

भाजपाने पक्षात गुंड घेतले आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी हल्ला केला आहे. गिरीश महाजन,  जयकुमार रावल आणि सुभाष भामरे यांनीच आपल्यावर हल्ला केला आहे. असा धक्कादायक आरोप आमदार अनिल गोटे यांनी टीव्ही 9 शी बोलताना केला.

काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान अनिल गोटे यांनी आपल्या भाषणात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. दानवे हे ‘दादा कोंडके’ आहेत तर महाजन हे ‘ग्रीस महाजन’ आहेत. अशी टीका गोटेंनी आपल्या भाषणात केली होती.

धुळ्यातील निवडणूक ही खूपच चर्चेची बनली आहे. धुळ्यात भाजपा विरुद्ध भाजपा असे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपसमोरच आव्हान निर्माण केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर अनिल गोटे यांची सभा झाली. या वादातून विरोधकांनी हल्ला केला असावा असं गोटेंच्या समर्थकांकडून बोललं जात आहे.

धुळे महानगरपालिकेत एक जागा बिनविरोध झाली असून 73 जागांसाठी आज  मतदान होणार आहे. भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आपल्या लोकसंग्रामच्या तिकीटावर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. याचा फटका भाजपला किती बसतो हे पहावे लागेल.

महापालिकेच्या 73 जागांसाठी  355 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

  • काँग्रेस – 22 उमेदवार
  • राष्ट्रवादी – 45 उमेदवार
  • भाजपा – 62 उमेदवार
  • शिवसेना- 48 उमेदवार
  • MIM – 12 उमेदवार
  • समाजवादी – 10 उमेदवार
  • लोकसंग्राम – 2+60 उमेदवार
  • मनसे – 1
  • बसपा – 9
  • भारिप बहुजन महासंघ – 5 उमेदवार
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.