जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत…, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
. पहिल्यांदा महिला मंत्रीचं घ्यायचे. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही.
नागपूर : दादा तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री घोषणा करत होते. हे लोकं टाळ्या वाजवत होते. आता सुधारणा आहे. तुमच्या काळात तीन पक्ष होते. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे नेते बसायचे. बाकी दोन पक्षांचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा मंत्री उत्तर देणार असेल, तर फक्त काँग्रेसचे आमदार बसायचे. मागण्या मान्य करून घेताना जबाबदारी असायची की, तुमचे आमदार उपस्थित ठेवा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
आमच्याकडं तसं नाही. सगळे भाजप आणि शिवसेनेचे आमदार बसलेले आहेत. तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात. बाक आम्ही वाजवितो. पण, तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. नेहमी पॅकेज म्हटलं जात होतं. आता पॅकेज नाही. समग्र विकासाचा आराखडा मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आपण काही सूचना महिला मंत्र्यांच्या संदर्भात केल्या आहेत. त्या अंत्यंत गंभीरपणे घेत आहोत. आम्ही आता मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करणार आहोत. पहिल्यांदा महिला मंत्रीचं घ्यायचे. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात चार महिला मंत्री होत्या. आम्ही त्यापेक्षा जास्त करू शकतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांचा अवलंब केला जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
निर्यात दरवर्षी वाढतचं आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यावर त्याचा परिणाम होत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना यामुळं फायदा होत आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये याप्रकारची कामं हातात घेतली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.