उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत… स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांचे मोठे वक्तव्य
कोणाचे हिंदुत्व खरे आहे हे जाणून घेतले पाहिजे. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असला पाहिजे कारण त्याचा विश्वासघात झाला आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू कसे असू शकतात?
आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो. आम्ही ‘पुण्य’ आणि ‘पाप’ मानतो. विश्वासघात हे सर्वात मोठे पाप म्हटले जाते. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत तेच घडले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता याचा त्रास सहन करत आहे. याबाबत प्रत्येकाच्या मनात वेदना आहेत. निवडणुकीतही हे उघड झाले आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आमच्या हृदयातील वेदना दूर होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे की उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे.” असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला सोहळ्याला विरोध केला होता. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत असा आरोप मोदी यांच्यावर केला होता. त्यामुळे ते वादात सापडले होते. मात्र. उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्यावेळी समर्थन दिले होते. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले, त्यांनी मला बोलावले आणि मी आलो. त्यांनी स्वागत केले. त्यांच्या विश्वासघातामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले पाहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आमच्या हृदयातील वेदना कमी होणार नाही. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत, असे ते म्हणाले.
जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. कोणाचे हिंदुत्व खरे आहे हे जाणून घेतले पाहिजे. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असला पाहिजे कारण त्याचा विश्वासघात झाला आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू कसे असू शकतात? असा सवाल त्यांनी केला. जनतेचा अनादर करणे योग्य नाही. ज्याला जनता बहुमत देते तो त्याच्या वेळेपर्यंत कायम ठेवला पाहिजे. सरकारमध्येच मोडून जनमताचा अनादर करणे ही चांगली गोष्ट नाही. राजकारणाशी आमचा काही संबंध नाही पण विश्वासघाताला पाप म्हटले आहे. यावर कोण बोलणार? राजकारणी बोलणार का? यावर धर्मगुरूच बोलतील असेही त्यांनी स्पष्ट केले.