अधिकारी ऐकत नसतील तर जोड्याने मारा, भाजप आमदाराचं वक्तव्य

भोपाळ : सरकारी अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना जोड्याने मारा, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या आमदाराने केलं. उत्तर प्रदेशच्या ललितपूर सदर या विधानसभा मतदारसंघातील आमदार रामरतन कुशवाहा यांनी हे संतापजनक वक्तव्य केलं. राज्यातील अधिकारी दोन महिन्यात ऐकले झाले नाही तर त्यांना जोड्याने मारा, असं कुशवाहा महरौनी येथील भाजपच्या कार्यकर्ता संमेलनात म्हणाले. सपा-बसपाची मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांनी निवडणुकांमध्ये […]

अधिकारी ऐकत नसतील तर जोड्याने मारा, भाजप आमदाराचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jun 06, 2019 | 1:04 PM

भोपाळ : सरकारी अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना जोड्याने मारा, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या आमदाराने केलं. उत्तर प्रदेशच्या ललितपूर सदर या विधानसभा मतदारसंघातील आमदार रामरतन कुशवाहा यांनी हे संतापजनक वक्तव्य केलं. राज्यातील अधिकारी दोन महिन्यात ऐकले झाले नाही तर त्यांना जोड्याने मारा, असं कुशवाहा महरौनी येथील भाजपच्या कार्यकर्ता संमेलनात म्हणाले. सपा-बसपाची मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांनी निवडणुकांमध्ये कार्यकर्तांना त्रास दिला, तसेच त्यांच्यावर सपा-बसपाची सदस्यता घेण्यासाठी दबाव आणला, असा दावा कुशवाहा यांनी यावेळी केला.

“उत्तर प्रदेशचे कामगार व रोजगारमंत्री मनोहरलाल पंथ, खासदार अनुराग शर्मा आणि मी स्वत: मिळून काम करु. जर अधिकारी महीना-दोन महिन्यात ऐकले नाहीत तर आपला जोडा काढा आणि जोड्याने त्यांना मारा. सहन करण्याचाही एक हद्द असते”, असं आमदार रामरतन कुशवाहा म्हणाले.

दुसरीकडे, पक्षातील नेत्यांनी या प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “गेल्या सरकारमध्ये अधिकाऱ्यांनी त्यांची मनमानी आणि भ्रष्टाचार केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अधिकारी गोंधळले, त्यांनी दुर्बल व्यक्तींना त्रास देण्यास सुरुवात केली. अशा अधिकाऱ्यांबाबत बोलताना कुशवाहा यांनी हे वक्तव्य केलं असावं. मुख्यमंत्र्यांनी अनेक अधिकाऱ्यांविरोधात कार्रवाई देखील केली”, असं स्पष्टीकरण भाजपचे बुंदेलखंडचे विभागीय आणि जिल्हा प्रमुख रामकिशोर शाहू यांनी दिलं.

“कुशवाहा यांच्या विधानाशी मी सहमत नाही. यामुळे विघटन होईल. मनोहरलाल पंथ यांनी त्याचवेळी कुशवाहा यांच्या या वक्तव्याचा विरोध केला होता. ते लवकरच आमदार आणि संघटनेची बैठक घेतील. तसेच, अशा अधिकाऱ्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल”, असेही रामकिशोर शाहू यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

VIDEO : भाजप आमदाराची महिलेला जबर मारहाण

ममता हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील? साक्षी महाराज पुन्हा बरळले

भाजप ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार

महाराष्ट्रात काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.