UP Police | राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की; संतप्त कार्यकर्त्यांची पोलिसांविरोधात निदर्शने
दिल्लीतून हाथरसकडे रवाना झालेल्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर अडवण्यात आल्यावर त्यांनी थेट गाडीतून उतरून पायी चालत हाथरसकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला.
उत्तर प्रदेश : सामूहिक बलात्काराची (Gang Rape) शिकार झालेल्या हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul ghandhi) यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्या. या दरम्यान, यूपी पोलिसांकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. दिल्लीतून हाथरसकडे रवाना झालेल्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर अडवण्यात आल्यावर त्यांनी थेट गाडीतून उतरून पायी चालत हाथरसकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (UP police Arrest Rahul Gandhi and Priyanka Gandhi)
यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी यूपी पोलिसांविरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधीना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. दिल्लीहून निघाल्यावर त्यांच्या गाड्या अडवल्याने त्यांनी थेट पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
#WATCH Congress leader Rahul Gandhi roughed up by police on his way to Hathras, at Yamuna Expressway, earlier today
Rahul Gandhi has been arrested by police under Section 188 IPC. pic.twitter.com/nU5aUSS64q
— ANI UP (@ANINewsUP) October 1, 2020
पीडित कुटुंबाची भेट घेण्यास निघालेले राहुल-प्रियंका
सलग दोन दिवसांतील सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणांनी यूपीसह संपूर्ण देश हादरला आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi) हाथरसच्या दिशेने रवाना झाले होते. ते हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार होते.
राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) हाथरसमध्ये येणार असल्याने, हाथरस (Hathras) जिल्ह्याची सीमा आज (1 ऑक्टोबर) पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. (UP police Arrest Rahul Gandhi and Priyanka Gandhi)
प्रियंका गांधींची उत्तर प्रदेश सरकारवर टीका
या सगळ्या प्रकारा दरम्यान, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी हाथरस प्रकरणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज पसरले आहे. मार्केटिंग आणि भाषणाने कायदा व सुव्यवस्था निर्माण होत नाही. मुख्यमंत्र्यांनी उत्तरे द्यायची वेळ आली आहे. जनतेला उत्तरे हवी आहेत’, अशा आशयाचे ट्विट करत, प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले आहे.
राहुल गांधीचीही आक्रमक भूमिका
या क्रूर घटनांनंतर उत्तर प्रदेश सरकारवर सगळ्या स्तरांतून टीका होते आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनीदेखील (Rahul Gandhi) हाथरस प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. हाथरस पीडितेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या कुटुंबालादेखील आतमध्ये येण्याची परवानगी दिली गेली नाही. ‘भारताच्या लेकीवर अत्याचार करुन, तिची हत्या केली जाते. सत्य लपवले जाते आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्कदेखील हिरावला जातो आहे’, असे ट्विट करत राहुल गांधींनी योगी सरकारवर टीका केली आहे.
(UP police Arrest Rahul Gandhi and Priyanka Gandhi)
संबंधित बातम्या :
उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू
UP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू