विधान परिषद निवडणूक : 19 दिवसांपासून विना शर्ट प्रचार, अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटलांनी यवतमाळमध्ये वेधले लक्ष
अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. (Upendra Patil)
यवतमाळ : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात 19 दिवसापासून शर्ट न घालता फिरणाऱ्या उपेंद्र पाटील यांनी निवडणुकीत लक्ष वेधून घेतले. अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी प्रचारादरम्यान शर्ट न घालता मतदारांना मत मागितले. उपेंद्र पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मतदान केंद्रावर भेटी दिल्या तसेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले.(Upendra Patil without wearing shirt appeal to voters do voting at Yavatmal)
विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न मांडण्यासाठी उपेंद्र पाटील यांनी 19 दिवसापासून शर्ट न घालता फिरणे सुरू केले. लग्न प्रसंग, सभा मेळाव्यात सगळ्या ठिकाणी ते विनाशर्ट प्रचार करत होते. विना अनुदानित शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना 100 टक्के अनुदान मिळावे म्हणून शिक्षक उमेदवार उमेदवार उपेंद्र पाटील यांनी अनोख्या पध्दतीने प्रचार राबवत मतदान मागितले.
उपेंद्र पाटील हे वाशिम जिल्ह्याच्या मानोरा येथील शाळेत ते कार्यरत आहेत. विना अनुदानित शाळेतील शिक्षकाची अवस्था वाईट असून त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत असाच राहीन आणि शिक्षकांचे प्रश्न सुटले की राजकारणातून माघार घेईन, असे त्यांनी सांगितले. (Upendra Patil without wearing shirt appeal to voters do voting at Yavatmal)
अनुदानित आणि विनाअनुदानित असा एक भाऊ तुपाशी तर एक भाऊ उपाशी अशी परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्यामुळे शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले आहे. महात्मा गांधींनी आपल्या अंगावरील कपडे काढून स्वातंत्र्याची लढाई लढली तसेच अंगावरील शर्ट काढून शिक्षण क्षेत्रामध्ये लागलेली कीड दूर करण्यासाठी विडा उचलला आहे. निवडून आल्यानंतर सभागृहात शर्ट घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली असल्याचे उपेंद्र पाटील यांनी सांगितले होते.
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघची निवडणूक यावेळी विविध विषयानी चर्चेत राहिली त्यात साडी वाटप असो की उमेदवार स्वतः मतदार नाही, सोबतच अशा पद्धतीने स्टंट करून मतदारांना मतदान मागण्याची पद्धत असो प्रत्येक उमेदवाराने आप आपल्या परीने आयडीयाची कल्पना वापरून मताचा जोगवा मागितला. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. (Upendra Patil without wearing shirt appeal to voters do voting at Yavatmal)
जिल्हानिहाय मतदारांची संख्या….
अमरावती- 10386 ,अकोला – 6480,वाशिम -3813 बुलढाणा -4784 ,यवतमाळ – 7459,एकूण – 35622
अमरावती शिक्षक मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
श्रीकांत देशपांडे (शिवसेना) मविआ पाठिंबा नितीन धांडे ( भाजप) दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ) उपेंद्र पाटील (अपक्ष)
Video : Devendra Fadnvis | प्रत्येक निवडणूक ही परीक्षा असते, या परिक्षेत भाजप पास होईल – देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis pic.twitter.com/cRPIDkPWmy
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
विधान परिषद निवडणूक: महात्मा गांधींचा आदर्श घेत वाशिमच्या उपेंद्र पाटलांचे विना शर्ट प्रचार अभियान
Graduate Constituency Elections LIVE | पुणे विभाग मतदान, दु. 12 पर्यंतची आकडेवारी
(Upendra Patil without wearing shirt appeal to voters do voting at Yavatmal)