Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतांसाठी काय पण, उर्मिलाने चाखली वडापावची चव

मुंबई: ‘रंगीला गर्ल’ अर्थातच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  उमेदवारी जाहीर होताच टेम्पल रन केलेल्या उर्मिलाने मतांसाठी मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड वडापावची चव चाखली. विशेष म्हणजे रविवारी रात्री तिने रिक्षाही चालवली होती. सध्या सर्वत्र निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवताना दिसत […]

मतांसाठी काय पण, उर्मिलाने चाखली वडापावची चव
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई: ‘रंगीला गर्ल’ अर्थातच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  उमेदवारी जाहीर होताच टेम्पल रन केलेल्या उर्मिलाने मतांसाठी मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड वडापावची चव चाखली. विशेष म्हणजे रविवारी रात्री तिने रिक्षाही चालवली होती.

सध्या सर्वत्र निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवताना दिसत आहेत. नुकतचं राजकारणात सक्रिय झालेली उर्मिला पहिल्या दिवसांपासून जोरदार प्रचाराच्या कामाला लागली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवसाचे निमित्त साधत रिक्षावाल्यांसोबत उर्मिलाने वेळ घालवला. इतकंच नव्हे तर मतांसाठी तिने रिक्षाही चालवली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास एका प्रचारसभेचे आयोजन करत तिथे मराठी आणि गुजरातीत भाषण केलं.

‘रंगीला गर्ल’ उर्मिलाची रिक्षा स्वारी

सोमवारी रात्रीच्या वेळी अचानक उर्मिला बोरीवली परिसरात प्रसिद्ध वडापावच्या गाडीजवळ पोहोचली. त्यानंतर तिने चक्क वडापाव खाल्ला, इतकचं नव्हे तर वडापाव खाल्ल्यानंतर त्याची चव कशी होती हे देखील सांगितले.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने राजकारणात सक्रीय होत बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर शुक्रवारी उर्मिलाला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच तिने बोरीवलीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तिने गुरुद्वारामध्ये जाऊनही दर्शन घेतले होते.

उर्मिला मातोंडकरचं ‘टेम्पल रन’, तिकीट जाहीर होताच, मंदिर, गुरुद्वाराला भेट

गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपम यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध सुरु होता. अखेर काँग्रेसचा हा शोध संपला असून या ठिकाणी उर्मिलाला उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान या मतदारसंघासाठी भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून उर्मिलाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्तर मुंबई मतदारसंघात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विरुद्ध गोपाळ शेट्टी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

पहा व्हिडिओ :

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.