योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, उद्योगपतींच्या भेटीगाठी, बैठकांचं सत्र, कसा असेल कार्यक्रम?, वाचा…
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येत आहेत.थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील. त्यांचा हा दौरा कसा असेल? वाचा...
मुंबई : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर (Yogi Adityanath Mumbai Daura) येत आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील. नामांकित उद्योग समुहांसोबत ते बैठका करणार आहेत. उद्योगपतींसोबत ते मिटिंग्स् करणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) उद्योग वाढावेत यासाठी योगी आदित्यनाथ प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या मुंबई दौऱ्यात आदित्यनाथ उद्योगपतींची चर्चा करणार आहेत. त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे.
उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी योगी आदित्यनाथ हे आज दुपारी मुंबईत येणार आहेत. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ आज आणि उद्या चर्चा करणार आहेत. उद्योगजगतातील बड्या हस्तींसोबत त्यांच्या बैठका होणार आहेत.
मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं असलेल्या वर्षा निवासस्थानाच्या मलबार हिल या परिसरात योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत.
उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
उत्तरप्रदेशात फिल्मसिटी उभारण्यात येत आहे. त्याच्या विस्तारासाठी आणि वाढीसाठी योगी आदित्यनाथ प्रयत्नशील आहेत. त्यासाठी बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत यांच्याशीही ते आज संध्याकाळी चर्चा करणार आहेत.यातून या फिल्मसिटीत काय गोष्टी असाव्यात. सिनेमा तयार करण्यासाठी या फिल्मसिटीमध्ये काय काय करावं लागेल, याविषयी ते चर्चा करणार आहेत.
कसा असेल दौरा?
आज 4 जानेवारीचा कार्यक्रम
दुपारी 2.15 – अमौसी विमानतळ, लखनौ येथून प्रस्थान
दुपारी 4.15 – आगमन, विमानतळ, मुंबई
सायंकाळी 5 वाजता – ताज हॉटेल, मुंबईत आगमन
यूपी डायस्पोरा सत्र संध्याकाळी 5 ते 6.15 पर्यंत
(मुंबई एनआरआयच्या रहिवाशांसोबत चर्चा)
संध्याकाळी 7.05 – हॉटेल ताजमधून निघतील
संध्याकाळी 7.20 वाजता – राजभवनात दाखल होतील. तिथं ते विश्रांतीसाठी थांबतील
उद्या 5 तारखेचा कार्यक्रम
सकाळी 8.30 – राजभवनातून बाहेर पडतील
सकाळी 8.45 – ताज हॉटेलमध्ये दाखल
सकाळी 9 ते 10 – विविध बँक अधिकाऱ्यांसोबत बैठका – हॉटेल ताज
दुपारी 12 ते 2 – G.I.S रोड शो, मुंबई इव्हेंट – हॉटेल ताज
संध्याकाळी 6 ते 6.30 – बॉलिवूड चित्रपट उद्योगातील निर्माते/दिग्दर्शकांसोबत बैठक – हॉटेल ताज
संध्याकाळी 8 – हॉटेल ताजमधून एअरपोर्टसाठी रवाना
संध्याकाळी 8.45 वाजता – विमानतळावर दाखल
संध्याकाळी 8.50 – मुंबई विमानतळावरून प्रस्थान
रात्री 10.50 वाजता- लखनौतील अमौसी विमानतळावर दाखल
योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत. पण चर्चा मात्र महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याचीच होत आहे. गुजरात निवडणुकीआधी जे मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जात होतं. ते उद्योग गुजरातला गेले. योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत. ते बड्या उद्योगपतींसोबत बैठका करणार आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे.