Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Naik : नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं भाजपला सिंधुदुर्गात नेस्तनाबूत करतील, वैभव नाईक यांचा घणाघात

वैभव नाईक टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते. निलेश राणे यांचा ही त्यांनी समाचार घेतला.ते म्हणाले निलेश राणे जर कुडाळ मध्ये तळ ठोकून राहिले तर मला कुठलही काम करावं लागणार नाही.

Vaibhav Naik : नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं भाजपला सिंधुदुर्गात नेस्तनाबूत करतील, वैभव नाईक यांचा घणाघात
वैभव नाईक
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 12:29 PM

सिंधुदुर्ग: नारायण राणे (Narayan Rane ) आणि त्यांची दोन मुलं सिंधुदुर्गातून भाजपला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य शिवसेनेचे (Shivsena) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केले आहे. वैभव नाईक टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते. निलेश राणे यांचा ही त्यांनी समाचार घेतला.ते म्हणाले निलेश राणे जर कुडाळ मध्ये तळ ठोकून राहिले तर मला कुठलही काम करावं लागणार नाही.यावेळी त्यांनी देवगड व कुडाळ मध्ये सत्ता स्थापन करण्याचा भाजपच्या मन्सूब्याला उधळून लावण्याचे संकेत देताना कुडाळ मध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असून त्यांना विनंती करणार असल्याचे ही वैभव नाईक यांनी सांगितले.

काँग्रेस योग्य निर्णय घेईल

निवडणूक वेगळी लढल्यामुळं कुडाळ मध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका असू शकते.काँग्रेसला विनंती करणार आहोत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं वैभव नाईक म्हणाले. नगराध्यक्ष कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसचा आहे.काँग्रेस योग्य भूमिका घेईल याची खात्री आहे, असं वैभव नाईक म्हणाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने देवगड मध्ये गट स्थापन केला आहे. कुडाळमध्ये ही तसे प्रयत्न सुरू आहेत, असंही नाईक यांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं गेलंय

भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल गेलं त्याचा कुडाळ आणि देवगड मध्ये परिणाम दिसला. नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं भारतीय जनता पार्टीला इथून नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत. या पुढच्या काळात शिवसेना महाविकास आघाडीला सोबत घेऊन जिल्ह्यात चांगलं यश मिळवेल, असंही वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय. गेल्या निवडणुकीत कुडाळ मध्ये शिवसेनेचे चार नगरसेवक होते.चार वरून ही संख्या 7 वर गेली.महाविकास आघाडी एकत्र लढली असती तर 12/14 जागा निवडून आल्या असत्या.निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत म्हंटल्यावर कुडाळ मधून चांगलं यश सेनेला मिळालं.निलेश राणेनी तळ ठोकून रहावं म्हणजे मला कुठलंही काम करावं लागणार नाही., असंही वैभव नाईक म्हणाले.

इतर बातम्या:

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

Vaibhav Naik slam BJP Leader Narayan Rane and Nitesh Rane Nilesh Rane

क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका.
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.