Delhi Election Results 2020: ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि अरविंद केजरीवालांचं अनोखं कनेक्शन!

केजरीवाल यांचं व्हॅलेंटाईन डे कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे ते 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Delhi Election Results 2020: 'व्हॅलेंटाईन डे' आणि अरविंद केजरीवालांचं अनोखं कनेक्शन!
Follow us
| Updated on: Feb 11, 2020 | 6:45 PM

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे (Delhi Election Results 2020). दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा आम आदमी पक्षाकडे (आप) एकहाती सत्ता सोपवली आहे. त्यामुळे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ कधी घेणार इतकाच प्रश्न बाकी आहे. यावर केजरीवाल यांचं व्हॅलेंटाईन डे कनेक्शन समोर येत आहे (Valentine Day and Arvind Kejriwal connection). त्यामुळे ते 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, 49 दिवसांनंतर 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिली. 2013 मध्ये 4 डिसेंबरला विधानसभा निवडणूक झाली. 8 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल आला. यात भाजपला 31, आपला 28 आणि काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळाला. या त्रिशंकु स्थितीनंतर आपने काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केलं. मात्र, 49 दिवसांमध्येच अरविंद केजरीवाल यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली.

मोठ्या राजकीय नाट्यानंतर 2015 मध्ये दिल्लीत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. निवडणूक आयोगाने 7 फेब्रवारीला मतदान आणि 10 फेब्रवारीला निकालाची घोषणा केली. यानंतर आपचे प्रवक्ता राघव चड्ढा यांनी आप सत्तेत आल्यानंतर अरविंद केजरीवाल 14 फेब्रवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतील, असं सांगितलं. आपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून 70 पैकी 67 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसला आपलं खातंही खोलता आलं नाही, तर भाजपला केवळ 3 जागांवर विजय मिळत एक अंकी आकडा गाठता आला. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

यानंतर अरविंद केजरीवाल यांचं 14 फेब्रवारीशी काही वेगळंच नातं तयार झालं. मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 फेब्रवारी 2016 रोजी त्यांनी व्हॅलेंटाईनचा उल्लेख करत ट्विट केलं. यात केजरीवाल म्हणाले, ‘मागील वर्षी याच दिवशी दिल्लीला ‘आप’सोबत प्रेम झालं होतं. हे नातं खूप खोल आणि कधीही न संपणारं आहे.’ 2018 मध्ये केजरीवाल सरकारने 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 फेब्रवारीलाच एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा देखील मुख्यमंत्रिपदाची शपथ व्हॅलेंटाईन डेलाच शपथ घेऊन आपलं खास कनेक्शन दाखवणार का हे पाहावे लागणार आहे.

Valentine Day and Arvind Kejriwal connection

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.