‘भेटली, पण नशीबात नव्हती’ सदाभाऊंची उडवलेली खिल्ली पाहून प्रकाश आंबेडकर म्हणाले…
योगेश सावंत या राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्याने सदाभाऊंच्या उमेदवारीवर भाष्य करणारं एक मीम ट्विट केलं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी कमेंट केली आहे.
मुंबई : सध्या विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council Election) जोरदार चर्चा आहे. कोणत्या पक्षाने कुणाला उमेदवारी दिली, कुणाला डावललं अशा नानाविध मुद्द्यांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अश्यात सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची उशिरा जाहिर झालेली उमेदवारी, त्यानंतर भाजपचा पाठिंबा, शेवटच्या क्षणी घेतलेली माघार या सर्व मुद्द्यांवरून त्यांना टोला लगावला जात आहे. याआधी अमोल मिटकरी, रविकांत वर्पे यांनी कोपरखळ्या मारल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) उपरोधात्मक टोला लगावला आहे.
योगेश सावंत या राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्याने सदाभाऊंच्या उमेदवारीवर भाष्य करणारं एक मीम ट्विट केलं. योगेश यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यात एका ढंपरवर “भेटली पण ती नशीबात नव्हती!”, असं लिहिलेलं आहे. त्यावर “सदाभाऊंची उमेदवारी”, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी कमेंट केली आहे.
योगेश यांचं ट्विट
सदाभाऊंची उमेदवारी ? pic.twitter.com/bCuhaG5wJ4
— yogesh sawant (@yogi_9696) June 13, 2022
योगेश सावंत यांच्या या ट्विटवर प्रकाश आंबेडकर यांनी कमेंट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी योगेश यांचं कौतुक केलंय. गुड सेन्स ऑफ ह्युमर असं आंबेडवर म्हणाले आहेत.
योगेश यांनी सदाभाऊंच्या उमेदवारीवर भाष्य करणारे अनेक मीम शेअर केले आहेत.
योगेश यांचे व्हायरल ट्विट
सदाभाऊ राईट नाऊ ???@Sadabhau_khot pic.twitter.com/Jfyq6vw4kw
— BURDEN OF PROOF !! (@kundanAvhad19) June 13, 2022
ही जनसेवा आहे उगीच तुम्ही गैरसमज पसरवू नका भाऊंनी असा कोणताही गाडा टाकलेली नाही…? pic.twitter.com/MZttO1Z6G8
— abhijeet shinde (@Abhijeet_9090) June 13, 2022
सदाभाऊ विधानपरिषदेच्या हार्दिक शुभेच्छा..?? pic.twitter.com/VYL8vAlSca
— Dr Bharat V. Chavan (@indiacspeaks) June 13, 2022
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून सदाभाऊंना टोला लगावला आहे. सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी त्यांना विश्रांती दिलीय, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना टोला लगावला आहे. “सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. पण सदाभाऊ त्या फडणविसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय… आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसलं”, असं ट्विट मिटकरींनी केलं आहे.
सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, “म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल.”@Sadabhau_khot
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 13, 2022