नगरसाठी वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार जाहीर, लढत तिरंगी होणार

अहमदनगर : भाजप आणि राष्ट्रवादीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुधाकर आव्हाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे. आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार अशी टीका सुधाकर आव्हाड यांनी जगताप आणि विखेंचं नाव न घेता केली. तसेच कोणत्याही परिस्थिती आमचाच विजय […]

नगरसाठी वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार जाहीर, लढत तिरंगी होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

अहमदनगर : भाजप आणि राष्ट्रवादीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही अहमदनगरमधून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुधाकर आव्हाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे. आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार अशी टीका सुधाकर आव्हाड यांनी जगताप आणि विखेंचं नाव न घेता केली. तसेच कोणत्याही परिस्थिती आमचाच विजय होणार, असा विश्वास सुधाकर आव्हाड यांनी व्यक केला.

कोण आहेत सुधाकर आव्हाड?

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुधाकर आव्हाड यांच्या नावाची घोषणा केली. सुधाकर आव्हाड हे मजले, चिंचोली तालुका जिल्हा नगर येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजले चिंचोली येथे झाले. तर आठवी ते अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण शिराळ चिंचोडी तालुका पाथर्डी येथे झाले. नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागात त्यांनी नेवासा आणि राहुरी तालुक्यात 25 वर्षे सेवा केली. 2014 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी राजकारण सुरु केलं.

भाजपकडून सुजय विखे पाटील

भाजपने नुकतेच पक्षात दाखल झालेले सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आघाडीमध्ये नगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. पण राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला होता.

राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप

राष्ट्रवादीने विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. नगरमध्ये तिरंगी लढत निश्चित झाली आहे. नगरमध्ये नात्यागोत्यांचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण, संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे कर्डिले कुणाला मदत करणार याकडे लक्ष लागलंय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.