महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढच्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात बोलताना जाहीर केलं. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सर्व उमेदवार स्वबळावर उतरवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या लोकसभा […]

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

सोलापूर : भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढच्या चार महिन्यांमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात बोलताना जाहीर केलं.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सर्व उमेदवार स्वबळावर उतरवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले, मात्र प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या जागांची पूर्तता न करु शकल्याने ही आघाडी होऊ शकली नाही. आता चर्चेच्या अगोदरच प्रकाश आंबेडकरांनी भूमिका जाहीर केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. मोदींचा तोल सुटला असावा म्हणून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करत आहेत. वैयक्तिक टीका करणे म्हणजे निवडणूक मोदींच्या हातातून निसटत चालल्याचे निदर्शक आहे, असं ते म्हणाले. शिवाय पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपेक्षा बसपा प्रमुख मायावतींना पाठिंबा देऊ, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पाठिंबा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे 48 उमेदवार उतरवले होते. महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात त्यांनी भारिप आणि एमआयएम यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उतरवले आणि युती-आघाडीसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. 23 मे रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.