Varsha Raut Ed Inquiry : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडी चौकशी संपली, पत्राचाळ प्रकरणाशी राऊतांच्या पत्नीचा काय संबंध?
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. वर्षा राऊत यांची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर रात्री 8 वाजता त्या ईडी कार्यालयातून बाहेर आल्या.
मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी कोठडीत (ED Custody) आहेत. याच प्रकरणात संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. वर्षा राऊत (Varsha Raut) यांची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर रात्री 8 वाजता त्या ईडी कार्यालयातून बाहेर आल्या. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? बाबत ईडी वर्षा राऊत यांची चौकशी झाल्याची शकत्या व्यक्त केली जात आहे.
प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी 6 लाख रुपये टाकले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. त्यामुळे ईडीकडून वर्षा राऊत यांची खाती तपासली जात आहे. तसेच त्यांच्या खात्यात आणखी मोठे व्यवहार झालेत का त्याची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यांच्या खात्यात हा पैसा आला कुठून? कशासाठीचे हे पैसे आहेत? त्या मागचा स्त्रोत काय? आदी माहिती ईडी वर्षा राऊत यांच्याकडून घेण्यात आल्याची शक्यता आहे.
पत्रा चाळ घोटाळ्यात वर्षा राऊत यांचा नेमका रोल काय?
या सगळ्या प्रकारणामध्ये संजय राऊत यांची कोठडी मिळाल्यानंतर ईडीने केलेल्या तपासात वर्षा राऊत यांचे नाव देखील समोर आले आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले. या कथीत घोटाळ्यात वर्षा राऊत यांचा नेमका रोल काय सगळ्याचीच ईडी चौकशी करत आहे.
पत्रा चाळ घोटाळा नेमंका आहे तरी काय?
संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करता पैसे उकळण्याचा कट रचला आणि त्या 672 भाडेकरूंचे भवितव्य, ज्यांची घरे 10 वर्षांपूर्वी पाडण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. प्रवीण राऊत, एचडीआयएल आणि गुरुआशिष कन्स्ट्रक्शनशी संबंधित आणखी काही लोकांनाही चौकशीसाठी बोलवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी सध्या खरेदी केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या आणखी काही मालमत्ता एजन्सीच्या तपासाखाली आहेत मात्र, राऊत आणि त्यांच्या भावांनी त्याची मालकी नाकारली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.