मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द
पुढचे काही दिवस राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
रत्नागिरी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जातीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजेल परंतु तूर्तास पुढचे काही दिवस राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनला कोकणातील सेना कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. (Varun Sardesai Cancelled His konkan Visit After Cm uddhav thackeray Appeal)
वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द
राजापूर आणि लांजा शिवसेना शाखांनी राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा आयोजित केला गेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सरदेसाई यांचा दौरा रद्द केला गेला आहे.
राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचे राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लांजा आणि राजापूरमध्ये शिवसेनेच्या युवा कार्यकत्यांशी संवाद वरुण देसाई संवाद साधणार होतेृ. तसंच वरुण सरदेसाई यांच्याबरोबर युवा सेनेचे काही पदाधिकारी देखील कोकण दौऱ्यावर होते. यावेळी सेनेने राजकीय मेळाव्याचं देखील आयोजन केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सेनेने सगळे कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन काय?
राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना आता पुन्हा डोकं वर काढतो आहे. आपण थोडं फिरायला लागलो. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त मोडू शकत नाही. समजूतदारपणे सूचनांचं पालन करा. सगळ्यांना वाटलं कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचं असतं. आता आपण समजूतदारपणाने वागून कोरोनाची साखळी तोडूयात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
(Varun Sardesai Cancelled His konkan Visit After Cm uddhav thackeray Appeal)
हे ही वाचा :
राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, सामनातून मोदींवर हल्लाबोल